लातूर – { दिपक पाटील } पोलीस ठाणे विटा जि.सांगली येथे दाखल गुरनं १४७/२०२२ कलम४२०,३४ भादवी मधील फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादी वरुन नमुद प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील आरोपीतांनी फिर्यादीस तुम्हाला सोन्याचे बिस्कीट देतो असे म्हणुन फिर्यादीला विश्वासात घेवुन तिची फसवणुक करुन तिचे गळयातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने काढुन घेतले वगैरे मजकुरावरुन पो.स्टे.विटा जि.सांगली येथे गुन्हा दाखल झाला. सदर गुन्हयाचे तपासात पो.स्टे.विटा जि.सांगली येथील पोलीसांचे हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजची माहीती पो.स्टे.लातुर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक गणेश कदम यांना मिळाले नंतर त्यांनी सदरची बाब पोलीस अधिक्षक निखील पिंगळे ,अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन , उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांना कळुवन त्यांचे मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन सदर सीसीटीव्ही फुटेज मधील ईसमाबाबत गोपनिय माहीती हस्तगत करुन आरोपी नाम लक्ष्मण केरबा जाधव वय ३३ वर्ष रा.सलगरा बु. हा असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीस लातुर ग्रामीण पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस करता आरोपीने सदर ठिकाणी गुन्हा केल्याचे कबुल केले, आरोपीस आणखी विश्वासात घेवुन विचारपुस करता सदर आरोपीने पो.स्टे.उदगीर शहर हद्दीत अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचे सांगत असुन ,त्याबाबत पो.स्टे.उदगीर शहर येथे गुरनं २४२/२०२१ कलम ४२० , ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर आरोपीस पो.स्टे.विटा जि.सांगली येथील पोलीसांचे ताब्यात देण्याची प्रकीया चालु आहे.सदरची कामगीरी निखील पिंगळे पोलीस अधिक्षक लातुर , अप्पर पोलीस अधिक्षक अनुराग जैन , उपविभागीय पोलीस अधिकारी लातुर ग्रामीण सुनिल गोसावी ,यांचे मार्गदर्शनाखाली लातुर ग्रामीण चे पोलीस निरीक्षक गणेश कदम , पोलीस अंमलदार महेबुब तांबोळी , गंगाधर खलंग्रे, गजानन टारपे, राहुल दरोडे सदबाजी सुरनर , चापोना दाजीबा यादव यांनी केली आहे.