Spread the love
अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) अंबाजोगाई ते लातूर रोडवर २० किलोमीटर अंतरावर असलेल्या ,लातूर हायवेवरील नंदगोपाल दूध डेअरी जवळ शनिवारी (दि.२३) सकाळी ट्रक-क्रुझरच्या भीषण अपघातात आठ जागीच ठार झाल्याची भीषण घटना
समोर आली आहे
.या अपघातात सात महिला आणि
एका पुरुषाचा मृत्यु झाला असून घटनास्थळी रक्त आणि
मांसाचा सडा दिसत आहे.मयत लातूर शहरा जवळील आर्वी व साई येथील
रहिवाशी असल्याची माहिती आहे
.हे सर्व जण आज
सकाळी उत्तमराव गंगणे (रा.राडी) ता. अंबाजोगाई यांच्याकडे चारधाम च्या कार्यक्रमाला जात असताना ट्रक आणि क्रुझरची
समोरासमोर धडक झाली.या भीषण अपघातात सात
महिलांचा आणि कार चालकाचा जागीच मृत्यु झाला
असून या  ते बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीजवळ आले असता त्यांच्या क्रुझरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात क्रुझरमधील सात जण ठार झाले तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निर्मला सोमवंशी (३८), स्वाती बोडके (३५), शकुंतला सोमवंशी (३८), सोजरबाई कदम (३७), चित्रा शिंदे (३५), खंडू रोहिले (३५, चालक) आणि अनोळखी एकाचा समावेश आहे. तर, राजमती सोमवंशी (५०), सोनाली सोमवंशी (२५), रंजना माने (३५), परिमला सोमवंशी (७०), दत्तात्रय पवार (४०), शिवाजी पवार (४५), यश बोडके (९), श्रुतिका पवार (६), गुलाबराव सोमवंशी (५०) आणि कमल जाधव (३०) हे दहा जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतात महिला आणि बालकांचा समावेश आहे.अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक खंडू गोरे, रणजीत लोमटे, तानाजी देशमुख यांनी रूग्णालयात धाव घेतली. पालकमंत्री धनंजय मुंडे मोबाईलवरून संपर्कात राहून सातत्याने अपडेट घेत होते. दरम्यान, अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!