औसा :- ( दिपक पाटील ) गेल्या काही दिवसांपूर्वीचं औसा तालुक्यातील सारोळा येथील एका सालगड्या च्या बायको बरोबर नवऱ्याच्या संमतीने सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. तर आज पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने लातूर जिल्हा हादरला आहे. औसा शहरात असणाऱ्या धुणी भांडी करून खाणार्या एका २८ वर्षीय विवाहितेवर तिच्याच भाच्याने दारूच्या नशेत जबरदस्ती बलात्कार केला असल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. पालकमंञी अमित देशमुख यांच्या जिल्ह्यात घटना घडल्याने एकचं खळबळ उडाली आहे.२८ वर्षीय पिडीत महिला ही शहरात आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. काल पीडिता आपल्या घरी काम करत होती. यादरम्यान तिचा भाच्चा राम पांडुरंग पन्हाळे (वय-२६) रा. उजनी ता. औसा जिल्हा लातूर, या नराधम आरोपींने पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत, तिच्यावर बलात्कार केला आहे. तर याविषयी कोणाला सांगितलं तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी देखील दिली होती. याप्रकरणी २८ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून औसा पोलीस ठाण्यात नराधम आरोपिंविरोधात ३७६ (ड), ३२३,५०४, ५०६,४५२ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या काही तासात नराधम आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अशीच एक घटना कालच लातूर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका १५ वर्षीय मुली सोबत असाच प्रकार होऊन पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती सुञाकडून देण्यात आली आहे , यातील काही आरोपी अटक व काही फरार असल्याची माहीती आहे , बलात्काराची घटना घडल्याने, लातूर जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे करत आहेत.
