दोन आरोपींना अटक
लातूर ( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे नेतृत्वातील पोलीस पथका कडून जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी संबंधाने घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
सदर मोहीम अंतर्गत पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. सदर पथक जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना दिनांक 25/06/2022 रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस गांधी चौक येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी आदर्श कॉलनी परिसरात चोरीच्या मोटरसायकलसह फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने सदर पथक आदर्श कॉलनी परिसरात पोहोचून माहितीप्रमाणे मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित नामे-
1) नसीर रोपण शेख, वय 31 वर्ष, राहणार माळकोंडजी तालुका औसा जिल्हा लातूर यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने नमूद मोटरसायकलला बनावट नंबर प्लेट लावली असून सदरची मोटार सायकल त्याचे मामा कडून विकत घेतल्याचे सांगितले.पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 276/ 2022 कलम 379 भादवी प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यांमध्ये नमूद आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
तसेच आणखीन एका प्रकरणात दिनांक 26/06/2022 रोजी सम्राट चौक परिसरातून विना नंबर प्लेट ची युनिकॉन मोटरसायकल विकण्याचा प्रयत्न करीत असलेला आरोपी नामे-
2) किशोर शिवाजी कांबळे, वय 23 वर्ष, राहणार सिद्धार्थ सोसायटी, लातूर यास चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या आणखीन एक साथीदारासह बीड जिल्ह्यातील रांजणी तालुका गेवराई येथून चोरलेले असल्याचे सांगितले. पोलीस ठाणे गेवराई येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 427/ 2019 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले. नमूद गुन्ह्यात किशोर कांबळे यास चोरलेल्या मोटारसायकलसह गेवराई पोलीस स्टेशन चे पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने उत्कृष्टरित्या लातूर जिल्ह्यातील एक व बीड जिल्ह्यातील एक अशा दोन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करून दोन मोटरसायकल सह,दोन आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 लाख 30 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरच्या पथकात सहाय्यक फौजदार वहीत शेख, रामचंद्र ढगे, पोलीस अंमलदार महेश पारडे तसेच पोलीस ठाणे गांधी चौक येथील पोलीस अमलदार दामोदर मुळे, असलम शेख, पाटील, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अमलदार घोगरे यांचा समावेश होता.
