
लातूर ( प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन ,उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.त्याप्रमाणे अहमदपूर पोलीस स्टेशन हद्दीमधील अवैध धंद्याची माहिती काढत असताना सदरच्या पथकास बातमीदारां कडून खात्रीशीर माहिती मिळाली की, अहमदपूर शहर परिसरामधील एका किराणा दुकान मधून प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची विक्री होत आहे,अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहनिशा करून सदर ठिकाणी छापा मारला असता केजीएन असे नाव असलेल्या दुकानात शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे, महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण 05 लाख 52 हजार 638 रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू चा माल मिळवून आला ,स्थानिक गुन्हे शाखा, लातूर येथील पोलीस अंमलदार अंगद कोतवाड यांचे तक्रारीवरून पोलीस अहमदपूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 332/ 2022 कलम 188,272, 273, 328 भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारे
1) इम्रान सिकंदर सय्यद, वय 33 वर्ष, धंदा व्यापार राहणार जगदंबा रोड,अहमदपूर
याचे कडून सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दुरपडे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलिस अमलदार अंगद कोतवाड, नवनाथ हासबे , राजेश कंचे, माधव बिलापट्टे, तुराब पठाण यांनी पार पाडली.
