Spread the love

सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांचे नेतृत्वात कारवाई

लातूर ( प्रतिनिधी ) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून कारवाई करण्याची मोहीम राबवित येत आहे.कॉईल नगर, लातूर परिसरामधील काही इसम प्रतिबंधित गांजाची चोरटी विक्री व्यवसाय करीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहनिशा करून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांचे नेतृत्वात शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी पोलिस पथकातील अधिकारी व अमलदारांसह गोपनीय माहिती प्रमाणे कॉइल नगर मधील एका घरावर छापा मारला. तेथे चोरटी विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गांजा बाळगलेले इसम आढळून आले. त्यांच्याकडून 155 ग्रॅम गांजा तसेच रोख रक्कम 3 लाख 9 हजार 350 रुपये इतकी रक्कम मिळून आली नमूद रक्कम व गांजा जप्त करण्यात आला.सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत कुदळे यांचे फिर्याद वरून  पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे प्रतिबंधित गांजाची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारे इसम नामे

1)शरीफ लतीफ शेख वय 34 वर्ष, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय अकाली सेना, वय 34 वर्ष, राहणार कॉइल नगर लातूर.
2) गणेश विभीषण बनसोडे, वय 19 धंदा मजुरी, राहणार कॉइल नगर लातूर.

यांच्यावर पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 308/ 2022, कलम 20 (ब)(क) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!