Spread the love

लातूर ( प्रतिनिधी ) : – साधारण महिनाभरापूर्वी लातुरातील श्रीनगर कॉलनीत ज्या कुख्यात गुंड आरोपींवर पोलिसांनी गोळीबार केला होता, त्या सराईत गुन्हेगार आरोपीसह 11 जणांविरुद्ध चाकूर पोलिसांनी “मोक्का” (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) लावला असून यातील 10 आरोपींना दि. 8 जूलै 2022 शुक्रवारी रोजी दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चाकूर पोलीस ठाण्याअंतर्गत शेतीच्या वादातून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या संदर्भात गुरनं. 97/22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फरार असलेला कुख्यात गुंड, सराईत गुन्हेगार मुख्य आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड याच्यावर लातूरच्या श्रीनगर कॉलनीत पोलिसांनी गोळीबार करून जखमी केले होते. या गुन्ह्यातील कुख्यात गुंड, सराईत गुन्हेगार नारायण इरबतनवाड याच्यासह अन्या सराईत गुन्हेगारासह अन्य दहा आरोपींचीच्या विरुद्ध सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली आहे. दि. 8 जुलै 2022 शुक्रवारी रोजी लातूरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष मोक्का न्यायालयाने या गुन्ह्यातील राजकुमार उद्धव गाटचेरले (वय 19 वर्षे, रा. मोरेवाडी ता. अहमदपूर), सुधीर भगवत रापतवार (वय 19 वर्षे, रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर), अमोल नर्सिंग कदम (वय 19 वर्षे, रा. शिरूर ताजबंद ता. अहमदपूर), पुरुषोत्तम तुकाराम सुरनर (वय 19 वर्षे, रा. अजनसोंडा, ता. चाकुर), प्रशांत विलास कांबळे (वय 19 वर्षे, रा. सय्यदपुर, ता. अमदपूर), सादीक इसामोद्दीन शेख (वय 52 वर्षे, रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर), धनाजी तुकाराम इरबतनवाड (वय 50 वर्षे, रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर), रमेश माधव भालेराव (वय 21 वर्षे, रा. शिरूर ताजबंद,ता.अहमदपूर), मार्कंडेय नारायण इरबतनवाड (वय 19 वर्षे, रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर) व अजितसिंह रघुवीरसिंह गहेरवार (वय 49 वर्षे, रा. कुमठा, ता. अहमदपूर) यांना 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सरकारी वकील मंगेश महेंद्रकर यांनी दिली. सध्या हे सर्व कुख्यात गुंडासह सराईत गुन्हेगार आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!