Spread the love

आम्ही सर्व भारतीय आहोत हा संकल्प तरुणांनी मनामध्ये कोरला पाहिजे…… शरणजी पाटील
मुरुम, ता. उमरगा, ता. १४ (प्रतिनिधी) : भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली हा तमाम भारतीयांसाठी राष्ट्र प्रेम व अभिमानाचा प्रसंग आहे. या स्वातंत्र्याकरिता क्रांतिकारकांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. अशा तमाम क्रांतिवीरांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करताना त्यांनी केलेल्या महान कार्याचे स्मरण ठेवणे हे प्रत्येक युवकांचे कर्तव्यच आहे. आज राष्ट्रभक्ती सर्वांच्या मनात आहेच पण आम्ही सर्व भारतीय आहोत हा संकल्प तरुणांनी मनामध्ये कोरला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरणजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव पदयात्रेच्या सांगता समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी सैनिक संघटनेचे व्यंकटराव चौधरी, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव गुरुजी, विजयकुमार हिरेमठ, बब्रुवान जाधव, मल्लिनाथ दिक्षीवंत, माजी सभापती सचिन पाटील, विजयकुमार वाघमारे, प्रा. डॉ. शौकत पटेल, महेश माशाळकर, माजी नगराध्यक्ष अनिता अंबर, रशीद शेख, गोविंद पाटील, दत्ता चटगे, प्रमोद आबा कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या पदयात्रेत शहारात ठिकठिकाणी व विविध चौकात महापुरुषांच्या प्रतिमेस शरण पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुरूम शहर काँग्रेस कमिटी व प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने शहरात रविवारी (ता. १४) रोजी आजादी गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या गौरव यात्रेची सांगता आण्णा भाऊ साठे चौकात करण्यात आली. यावेळी डॉ. शौकत पटेल, प्रमोद कुलकर्णी, विजयकुमार . हिरेमठ आदींनी मनोगत व्यक्त केले. ही गौरव यात्रा शहरातून अभूतपूर्व निघाली. यामध्ये युवकांनी उत्स्फूर्त सहभागासह बालकांनी महापुरुषांच्या वेशभूषेत सहभाग नोंदवला. घोषणाबाजी, आतिषबाजी व पुष्पवृष्टी करत संपूर्ण वातावरण तिरंगामय बनले होते. जिल्हा परिषद सदस्य रफीक तांबोळी, बबनराव बनसोडे, महावीर नारायणकर, घैस शेख, देवराज संगुळगे, श्रीकांत बेंडकाळे, महालिंग बाबशेट्टी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश राठोड, शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, गणेश अंबर, राजू मुल्ला सह विविध संस्था, संघटना, युवक-युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण गायकवाड तर आभार राहूल वाघ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!