Spread the love


उस्मानाबाद,दि.19(प्रतिनिधी):- राज्य सेवा पूर्व परीक्षा उस्मानाबाद जिल्ह्यातील नऊ उपकेंद्रांवर रविवार दि.21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 ते 12.00 व 3.00 ते  सायंकाळी 5.00  दोन सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. एकूण दोन हजार 588 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

परीक्षा उपकेंद्र असे: उपकेंद्र क्र.एक श्रीपतराव भोसले हायस्कूल (पहिला मजला)-240, ,(पार्ट-A) उपकेंद्र क्र.दोन श्रीपतराव भोसले (दुसरा मजला) ,(पार्ट-B) -384, उपकेंद्र क्र.तीन श्रीपतराव भोसले ज्यु.कॉलेज (तिसरा मजला)-384, उपकेंद्र क्र.चार श्रीपतराव भोसले हायस्कूल (आण्णा ई टेक्नो) नवीन इमारत-264, उपकेंद्र क्र.पाच रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,पहिला व दुसरा मजला-288,(पार्ट-B) उपकेंद्र क्र.सहा रामकृष्ण परमहंस महाविद्यालय (पनवीन इमारत) -192, उपकेंद्र क्र.सात छत्रपती शिवाजी हायस्कुल,तांबरी विभाग,-336, उपकेंद्र क्र.आठ श्री रविशंकर विद्यामंदिर, जाधववाडी रोड,हातलादेवी कॅम्पस-360 उपकेंद्र क्र.नऊ रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,तळ मजला (पार्ट-A)-240.
या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे, परीक्षार्थींना कसलाही अडथळा होऊ नये या दृष्टीने परीक्षेसाठी संबधित नसलेल्या व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास पाबंद करणे, तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स, फॅक्स, ईमेल, रेडीओ, इंटरनेट सुविधा, भ्रमणध्वनी (मोबाईल), संगणक, गणनायंत्र (कॅलक्युलेटर) आणि अशा इतर प्रकारच्या स्वरुपातील बाबी विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येवू नये. म्हणून परीक्षा केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागु करणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन या परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे. परीक्षा केंद्राचे परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत,परीक्षा केंद्राचे परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यांत येणार नाही, परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानपट्टी, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक, कॉम्प्युटर सेंटर्स, इंटरनेट कॅफे इत्यादी माध्यमे बंद राहतील,परीक्षा केंद्राच्या
परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, फॅक्स, ईमेल आणि इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल,कोणत्याही व्यक्तींकडून परीक्षा सुरळीतपणे तसेच शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनांस प्रवेशास मनाई राहील. परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल,केवळ संबधित परीक्षा केंद्रावर नेमणुक केलेले अधिकारी/कर्मचारी, शासकिय कामावरील अधिकारी आणि कर्मचारी, संबधित शाळेचे मुख्याध्यापक /शिक्षक/कर्मचारी आणि परीक्षार्थी यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील. इतरांना (परिक्षार्थींच्या नातेवाईकासह) प्रवेश असणार नाही,परीक्षा केंद्राचे 100 मीटरचे आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही, परीक्षा केंद्रात परीक्षेशी संबधित अधिकारी/कर्मचारी आणि परीक्षार्थी सोडून कुणालाही प्रवेश असणार नाही.
हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षा केंद्रावर निगरानी करणारे अधिकारी आणि पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचेबाबत त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत. हे आदेश दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या कालावधीत संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात लागू राहतील.या आदेशाची अवमानना केल्यास भारतीय दंड विधान संहितेचे कलम 188 नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.
हा आदेश आज दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी माझ्या सही व कार्यालयाचे शिक्यानिशी देण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी कळविले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!