
लातूर ( दिपक पाटील) लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज काम सुरूच असून एका मागे एक कारवाया चालूच असून क्लास वन ते क्लास फोर अधिकारी जाळ्यात अडकत आहेत. अशीच एक तक्रार काल दि 20-09-2022 ला प्राप्त होताच तक्रारदाराकडून सुरुवातीला सात हजार रुपयाची मागणी करून नंतर सहा हजार रुपये रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक 1) सुधाकर जगन्नाथ पोतदार व 2) लिपिक शशिकांत विठ्ठल खरोसेकर दोघेही सदानंद प्राथमिक विद्यालय लातूर यांना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आले आहे ,यातील आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक व लिपीक यांनी तक्रारदारांची शिक्षिका पत्नी यांची एक आठवडा अर्जित रजा मंजूर करणेकरीता तक्रारदार यांना शाळेत बोलावून सुरुवातीस 7,000/- रु ची मागणी केली व दि. 21/09/2022 रोजी आलोसे क्रमांक 2 यांनी तडजोडी अंती एक हजार कमी द्या म्हणून 6,000/- रु ची पंचासमक्ष लाचेची मागणी केली.
त्यानंतर लाच मागणी केलेली रक्कम 6,000/- रु आलोसे क्रमांक लिपीक यांनी सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेत शाळेतील मुख्याध्यापक यांचे कार्यालयात पंचासमक्ष आलोसे मुख्याध्यापक यांचे समोर स्वीकारून मुख्याध्यापक यांचे कडे दिली. दोन्ही आरोपीतांचा जागेवरच लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले व पूढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे , तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक,
ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड
मोबाईल नंबर – 09623999944
पंडीत रेजितवाड, पोलिस उप अधीक्षक,
ला.प्र.वि. लातुर
मोबाईल नंबर – 09309348184
ला.प्र.वि.लातूर कार्यालय दुरध्वनी – 02382242674
@ टोल फ्रि क्रं. 1064
