Spread the love

उस्मानाबाद – ( राहुल हौसलमल) राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी शुक्रवारी उस्मानाबादेत आले असता, सभागृहात प्रवेश देण्यावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले. ठाकरे गटाच्या काहींना प्रवेश नाकारल्यानंतर व बाहेर हाकलून देण्यात आले नंतर ठाकरे गटांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनाही प्रवेश देऊन नये, अशी भूमिका घेतल्यानंतर दोन्हींकडूनही जोरदार घोषणाबाजी झाली. प्रकरण हाताबाहेर जाण्याच्या आतच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सभागृहाबाहेर येऊन सर्वांनाच बाहेर काढण्याचे आदेश दिले. यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हुसकावले. या गोंधळामुळे जिल्हा कचेरीचे दोन्ही गेट बंद करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्यांनाही कामानिमित्त कार्यालयात येता आले नाही.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत नियोजन भवनात दाखल झाले. त्यांच्यासमवेत आमदार ज्ञानराज चौगुले हेही होते. थोडाही विलंब न करता त्यांनी थेट बैठकीला हजेरी लावली. याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने जमा झाले होते. आपणालाही प्रवेश मिळावा यासाठी शिंदे गटाचे काही पदाधिकारी प्रयत्न करीत होते. परंतु, बैठकीशी संबंधित नसलेल्या मंडळींना प्रवेश नाही, असे पोलीस ठासून सांगत होते. तोवर ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील आले. त्यांच्यासमवेत स्वीय सहायकही होते. दोघांना आत सोडल्यानंतर स्वीय सहायकांना पोलिसांनी रोखले. त्यावर खा राजेनिंबाळकर यांनी “ते माझे पीएआहेत. त्यांच्याकडे महत्त्वाची कागदपत्रे आहेत. त्यांना सोडा”, असे म्हटल्यानंतर आत सोडले, ठाकरे गटाच्या इतरांना मात्र प्रवेश दिला नाही. तोवर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरज (महाराज)साळुंके, दत्ता साळुंके हेही आले. प्रवेश मिळावा यासाठी पोलिसांशी चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. “त्यांना प्रवेश देता तर आम्हालाही प्रवेश मिळालाच पाहिजे, अशा शब्दात मोठमोठ्याने बोलू लागले. यानंतर शिंदे गटाचेदोन्ही गेट बंद, सर्वसामान्य खोळंबले

ठाकरे आणि शिदे गटाच्या पदाधिकायांनी केलेल्या घोषणाबाजीनंतर पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. केवळ आतील लोकांनाच बाहेर सोडले जात होते.

बाहेरून आत येणाऱ्यांना मात्र एंट्री बंद करण्यात आली होती. त्यामुळे आपल्या कामानिमित्त आलेल्या मंडळीलाही काही तास जिल्हा कचेरीत एंट्री मिळाली नाही. याबाबत अनेकांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.पदाधिकारीही जोरजोराने बोलले. दोन्ही बाजूचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सभागृहाबाहेर आले. बैठकीशी संबंधित नसलेल्या कोणालाही प्रवेश देऊ नका, असे पोलीस अधिकाऱ्यांना फर्मान सोडले.

यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण करून तिथे शेकडोच्या संख्येने थांबलेल्या सर्वांनाच बाहेर हुसकावले. त्यानंतर दोन्ही गटांचे पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात थांबले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!