Spread the love

                                     

लातूर-( प्रतिनिधी )केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील आठ गावांमध्ये नवीन पाणी पुरवठ्याच्या योजनेतील १३ कोटी ९२ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते करण्यात आले आहे . खासदार सुधाकर शृंगारे हे केंद्र सरकारच्या जलशक्ती विभागाच्या समितीचे सदस्य आहेत . त्यामुळे त्यांनी लातूर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत योजनांसाठी  साधारण १२०० कोटी पेक्षा जास्त निधी  उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. 

चाकूर तालुक्यातल्या जगळपूर, शिवनखेड, कवठाळी ,वडवळ,घारोळा,अंबुलगा, घरणी,लातूररोड या आठ गावातील नवीन पाणी पुरवठा योजना ,विहीर खोदकाम ,जलकुंभ  बांधकाम , पाईपलाईन अश्या जलजीवन मिशन अंतर्गत कामांचे भूमिपूजन खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पाणी पुरवठ्याच्या या योजना कार्यान्वित झाल्या नंतर वरील आठ गावांना मुबलक  पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे . 

         जगळपूर येथे  जलजीवन मिशन अंतर्गत ६०. ५० लाखांचा  निधी मंजूर  करण्यात आला आहे . शिवनखेड येथे १७४. ९८ लाख  रुपयांचा निधी जलजीवन मिशन अंतर्गत देण्यात आला आहे तर इतर विकासकामांसाठी  २७ लाख  रुपये निधी देण्यात आला आहे. कवठाळी  येथे ६८.३१  लाख निधी  जलजीवन अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे ,तर ५०  लाख  रुपयांचा निधी इतर विकासकामांसाठी देण्यात आला आहे. कवठाळी  येथील भूमिपूजन कार्यक्रमात हे गाव विकासकामांसाठी आपण दत्तक घेत असल्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी जाहीर केले आहे . वडवळ-नागनाथ येथे ४९१. ९४  लाख रुपयांचा निधी जलजीवन मिशन अंतर्गत नवीन जलकुंभ उभारणी आणि पाणी पुरवठा योजनेसाठी देण्यात आला आहे, घारोळा  पाणी पुरवठा योजेनसाठी जलजीवन मिशन मधून ५८.२७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे . तर ६ लाख रुपयांचा निधी इतर कामांसाठी देण्यात आला आहे .  अंबुलगा येथे जलजीवन मिशन अंतर्गत ४२,२२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.  घरणी येथील पाणी पुरवठयासाठी ८८.१७ लाख  रुपये निधी  जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे.  लातूररोड  येथे जलजीवन मिशन अंतर्गत ४०८.१९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे . या सर्व पाणी पुरवठा योजना आणि विकास कामांचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. 

                वरील आठही  गावात झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमास खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह , जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार , उपकार्यकारी अभियंता धनंजय मुळे , शाखा अभियंता राहुल शृंगारे , जगळपूरच्या  सरपंच स्वाती ठाकूर , गोविंद बाणापुरे, राजेश्वर मोटे , मनोहर बड्डे पाटील , शिवाजीराव बैनगिरे , रोहिदास वाघमारे, माधव खलंग्रे, शिवनखेडच्या सरपंच सुषमा दांडगे, उपसरपंच सोमनाथ नवबदे , बालाजी आलापुरे . सीए  दिगंबर साके, चंद्रकांत कुल्ले , विक्रम पांचाळ, बळीराम बुड्डे पाटील, वडवळचे सरपंच मुरलीधर सोनकांबळे, अण्णासाहेब पाटील. घारोळचे सरपंच सत्यभामाबाई चिंते, उपसरपंच रजाक शेख, चेअरमन प्रदीप जाधव, विष्णू कनामे, लक्ष्मण सूर्यवंशी. अंबुलगाचे सरपंच गोविंद जाधव , गणेश जाधव, घरणीच्या सरपंच उषाताई कांबळे, अशोकदादा चिंते, रणजित मिरकले पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!