Spread the love

नळदुर्ग ( श्रीकांत मटकीवाले) – थोडक्यात माहिती अशी की दि.18/03/2023 रोजी जळकोट येथे आठवडी बाजारात पेट्रोलिंग करण्यासाठी दुपारी 02/30 वाजण्याच्या सुमारास पवनकुमार अंधारे, सोबत पोलीस हवालदार शिंदे,पोलीस अंमलदार दांडेकर,सगर, बारकुल असे जळकोट कडे जात असताना मुर्टा पाटीजवळ गेले असता जळकोट कडून एक लाल रंगाची स्विप्ट डिझायर क्र एमएच 25 ए एस 9589 ही संशयित रित्या रोडने जातानी दिसल्याने त्यास थांबवून चौकशी केली असता सदर कार चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- रोहीत संजय राठोड, वय 20 वर्षे, रा. शास्त्री चौक नळदुर्ग असे सांगून त्याच्या कडे अधीक चौकशी केली असता प्रथम उडवा उडवीची उत्तर दिल्याने पथकाने सदर कारची पाहणी केली. त्यामध्ये 14 पांढऱ्या रंगाचे पोत्यामध्ये गुटखा एकुण 34 पांढऱ्या बॅगमध्ये मिळून आल्याने महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुडे असलेली पुडके असा एकुण 1,96,000 ₹ किंमतीचा माल त्याचा सविस्तर पंचनामा करुन मालासह कार सह असा एकुण 8,96,000 ₹. माल जप्त करुन ताब्यात घेतला.

तसेच दि. 24/03/2023 रोजी पेट्रोलिंग करत असताना रात्री 11.30 सुमारास इटकळ दुरक्षेत्र हद्दीतील बीट भागात आयशर टेम्पो क्र. केए 32 एए 2000 संशियत रित्या रोडने जाताना दिसल्याने त्यास थांबवून चौकशी केली असता सदर टेम्पो चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- फारुख अहमद जावेद अन्सारी, वय 35 वर्षे, रा. मेहबुब नगर गुलबर्गा. कर्नाटक असे सांगून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांने उडवा उडवीची उत्तर दिल्याने पथकाने सदर टेम्पोची पाहणी केली. त्यामध्ये गुटखा सदृश्य पदार्थ SGR 2000 नावाचा गुटखा एकुण 34 पांढऱ्या बॅगमध्ये मिळून आल्याने. पथकाने खात्री केली असता त्या पोत्यांत असणाऱ्या छोट्या पिशव्यांत महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या असलेली पुडके असा एकुण 10,81,200 रुपये किंमतीचा माल त्याचा सविस्तर पंचनामा करुन मालासह आयशर टेम्पो असा एकुण 30, 81, 200 रुपये चा . माल जप्त करुन ताब्यात घेतला. जप्त मालाची तपासणी होण्यासाठी पोलीसांनी अन्न व औषध प्रशासनास कळवले असता श्रीमती- नसरीन तनवीर मुजावर यांनी जप्त पदार्थ हा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत गुटखा असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी श्रीमती- मुजावर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नमूद कार व टेम्पो चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 272, 273, 188, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26 (2) (I), 27 (2) सह वाचन अधिनिय क 30(2) (अ) सहवाचन अधि क 2, 3, 4 वि.बं. दं. कलम 59 आंतर्गत 133/2023 व 134/2023 असे दोन गुन्हे नळदुर्ग पोलीस ठाणे येथे काल दि. 25.03.2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला .

        सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  श्री. नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलीस ठाणे  सपोनि- सिद्धेश्वर  गोरे, सपोनि- श्री. मोटे, पोउपनि-   पवनकुमार अंधारे पोलीस अंमलदार- यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!