सातारकराकडूंन होतोय अभिनंदनचा वर्षाव.
सातारा (संभाजी पुरीगोसावी ) पुण्याच्या बहुचर्चित मेट्रो प्रकल्पांच्या दुसऱ्या टप्प्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यामध्ये सातारच्या अपूर्वां प्रमोद आलटकर हिने पुणे मेट्रो येथे प्रथम महिला लोको पायलट होण्यांचा बहुमान मिळवला आहे. अपूर्वांच्या यशाबद्दल संपूर्ण सातारकरांकडूंन अभिनंदनच वर्षांव होत आहे. अपूर्वा हिने ज्ञानश्री विद्यालयाची मेकॅनिकल इंजिनिअरिंगची विद्यार्थिंनी आहे. महाविद्यालय शिक्षणानंतर तिने संगणक क्षेत्रात देखील काम करण्यांची संधी मिळवून सुद्धा तिने मेकॅनिकलमध्येच करिअर करण्यांचा चांगलाच निर्णय घेतला होता. आपल्या मेहनतींच्या बळावर अपूर्वांची पुणे मेट्रो स्टेशन कंट्रोल पदावर नेमणूक झाली आहे. तिने लोको पायलट होण्यांचा निर्णय घेतल्यानंतर दोन महिन्यांतच खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन तिने प्रथम महिला लोक पायलट होण्याचा चांगलाच बहुमान मिळवला. अपूर्वांच्या यशाबद्दल संपूर्ण सातारावासीयांकडूंन अभिनंदनचा वर्षाव होत आहे.