Spread the love


खुणाच्या गुन्ह्यातील 4 आरोपींसह, 2 पिस्टल,17 जीवंत काडतुसे, 1 खंजर ताब्यात.

निलंगा (प्रतिनिधी)स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील पथक निलंगा भागात गस्तीवर असताना काही संशयित इसम हत्यारा सह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती भेटली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 12/06/2024 रोजी रात्री 09.00 वाजण्याच्या सुमारास निलंगा ते हाडगा जाणाऱ्या रोडवरील येडेश्वरी मंदिरासमोर उभा राहिलेले संशयित इसमांवर अचानक छापा टाकून गाडीची व इसमांची झडती घेतली.
पथकाला झडतीत आरोपी नामे 1) मयुर नितीन आवचारे वय 26 वर्षे रा. काटीपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी, पुणे, 2) अक्षय रामदास टेकाळे वय 21 वर्षे रा. काटीपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी, पुणे, 3) विलसन ऊर्फ अविनाश पाथीराज डिमेंन्टी वय 31 वर्षे रा. काटीपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी, पुणे 4) निशांत राजेंद्र जगताप वय 31 ‘वर्षे रा. बोपोडी सर्वे नंबर 26 भाउ पाटील रोड, पुणे, 5) शाम गायकवाड अंदाजे वय 26 वर्षे रा. बामणी ता. निलंगा जि. लातूर (फरार) हे बँक आणि सराफा दुकानावर दरोडा टाकण्याचे तयारीने येवुन दरोडा टाकण्याचे साहित्य ज्यात पिस्टल-2, जिवंत काडतुस-17. खंजर-1, एक पांढ-या रंगाच्या टाटा पंच गाडी क्रमांक एमएच 14 एलजे 3169 गाडी व मिरची पावडर सह एकूण किंमत 13,64,300/-रु.चे मुद्देमालासह दरोडा टाकण्याचे तयारीत असताना मिळुन आले.
सदर प्रकरणी कलम 399, 402, 120(ब), भादवि सह कलम 3(1) 25, 7(अ)/25 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे पो.स्टे.निलंगा येथे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतील 2 आरोपी हे पुणे येथील मुन्ना जगताप गॅंग चे असून त्यांनी ढमाले गॅंग च्या दिपक कदम याचा दिनांक 29/05/2024 रोजी खून केल्याने पो.स्टे.सांगवी, पिंपरी चिंचवड गुरनं 238/24 कलम 302 भादवि. सह कलम 3/25,3/27 शस्त्र अधिनियम या गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे. खुनाचा गुन्हा घडल्यापासून पिंपरी चिंचवड पोलिस या 2 आरोपींचा शोध घेत होते. तसेच इतर 2 आरोपी हे पो.स्टे. MIDC जि.लातूर येथील गूरनं 382/2019 कलम 302 भादवि या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.
सदरची कारवाई श्री सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक लातूर, श्री अजय देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शनात श्री संजीवन मिरकले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री पल्लेवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री संजय भोसले, पोलीस हवालदार, रामहरी भोसले, पोलिस हवालदार, प्रकाश भोसले, पोलीस हवालदार मोहन सुरवसे पोलीस हवलदार राजेश कंचे, पोलीस नाईक योगेश गायकवाड, पोलीस नाईक रवी कानगुले, चालक पोलीस नाईक निटुरे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या पथकाने कामगिरी पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री पल्लेवाड निलंगा पोलिस ठाणे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!