Spread the love

भादा :- { दिपक पाटील } औसा तालुक्यातील ग्रामीण भागात काळात अवैध दारू विक्री व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हेतू परस्पर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन काळात लपून-छपून दारू विक्री सुरू होती. लॉकडॉऊनमध्ये शिथीलता येताच शासनाने सरकारमान्य देशी दारू दुकानांतून व वाईन शाॅप मधून पार्सलच्या रूपात दारू विक्री सुरू असून ही विक्री जोमात विक्री सुरू असल्याचे दिसत आहे.औसा तालुक्यातील भादा पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या बेलकुंड ,मातोळा,हिप्परगा,देवताळा, या ग्रामीण भागासह स्थानिक भागात सुद्धा देशी दारू पासून तर विदेशी दारूपर्यंत सर्वच प्रकारची दारू प्रतिबंधित वेळेत सर्रास मिळत आहे.या देशी व विदेशी दारूमध्ये काही बनावटी दारूची विक्री होत असल्याचे मध्यपींमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे.या दारु पोहोचविणाऱ्या तस्करांचेही राज्य उत्पादन शुल्क विभागा सोबत चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे.व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक उस्मानाबाद प्रतेक महीन्याला मेवा कसा मिळेल यात व्यस्त आहे त्यामुळेच भर चौकातून जात असलेली त्यांची वाहने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कधीच अडविली जात नाहीत.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी कधीतरी अवैध दारु विक्रेत्यांकडून धाडी टाकून मुद्देमाल जप्त करतात परंतु जप्त केलेला विविध प्रकारचा विशिष्ट बॅच नंबरचा माल हा नेमका कोणत्या सरकारमान्य दुकानातून पुरवठा केला गेला? याची साधी चौकशीही केली जात नाही. त्यामुळे कितीही कारवाया केल्या तरी या दारू तस्करांचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही अशाच अविभार्वात दारु विक्रते वागताना दिसत आहेत. एखाद्या वेळी कारवाई झाली तरी पुन्हा नवीन जोमाने दारूची तस्करी करणे सुरू करतात. जप्त केलेल्या मालाची सखोलपणे चौकशी करण्याची मागणी होत आहे.भर चौकात दारुची होते विक्रीअवैध दारु विक्रीचा प्रकार तालुक्यात सर्रास सुरू असून वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाला सूचना देऊनही या प्रकाराकडे लक्ष दिले जात नसल्याने यावर वरदहस्त नेमका कुणाचा? असा सवाल ग्रामवासीयांतर्फे विचारला जात आहे. औसा तालुक्यात सरकारमान्य देशी दारूची दुकाने दिसून येतात.यात काही दुकानांतून व परिसरातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रेत्यांना एका मर्जीतल्या व्यक्तीकडून दुचाकीद्वारे दिवसाढवळ्या व रात्रीला भर चौकातूनच दारूचा पुरवठा केला जातो हे विशेष. पण काहीजण त्याचे काहिही संबंध नसताना आपला अंतर्गत द्वेषातून विशिष्ट विभागातील कर्मचाऱ्यांना माञ टार्गेट करून पुर्ण विभागालाच बदनाम करत असल्याचे चित्र दिसुन येत आहे . भादा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करत
खाजगी वाहनाने, पोलीस पथके तयार करून, मातोळा, हिप्परगा, देवताळा, बेलकुंड या 0४ गावात एकाच वेळी अवैध दारू विक्रेत्यांवर रेड करण्यात आल्या,०३ रेड झाल्या असून दारू व दारू विक्रीचे साहित्य असा एकूण ४९,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व १.अण्णासाहेब हरिबा शिंदे २. ज्ञानोबा देविदास आनंदगावकर दोघे रा. मातोळा, ३. बालाजी शहाजी बर्डे रा. मातोळा ४.फिरोज मैनोद्दीन शेख रा. हिप्परगा. ता. औसा या लोकांवर कारवाई करण्यात आली सदरील कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले, पोलीस उपनिरीक्षक मुळीक,पो.हे. दोलारे, सूर्यवंशी,गिरी,कलमे,चव्हाण,पवार,दिंडे, सगर यांनी कामगिरी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!