
किनगाव (प्रतिनिधी) येथील परिसरातील माकेगावचा मटका किंग किनगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून तो मटका खेळवत असताना आढळून आला आहे. सविस्तर माहिती अशी की फिर्यादी मलिकार्जून पलमटे नापोका यांच्या फिर्यादी वरून आरोपी गोविंद महादेव लहाने रा. माकेगाव ता.रेणापूर यांनी माकेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे रोडवर मटका खेळत व खेळवत असताना आढळून आला.त्यात आकड्यावर लावलेली चिठी,निळ्या शाईचे पेन,रोख रक्कम 650 रुपये.माल मिळून आला.आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मटक्याच्या आकड्यावर लाऊन कल्याण नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना रोख रक्कम व जुगाराचे साहित्य सह मिळून आला,म्हणून गु.र.नं.265/2021 कलम 12अ. म.जु.का नुसार नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास सपोनी यांच्या मार्गदर्शनाखाली नापोका पलमटे हे करत आहेत.
