किनगाव :- (प्रतिनिधी) कोळवाडी शिवारात आखाड्यावर बांधलेला बैल दोन जनाणी गुरुवारी दुपारी चोरून नेला. शेतकऱ्याच्या फिर्यादी वरून किनगाव पोलिसात शनिवारी दोघा विरोध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोळवाडी येथील शेतकरी तुकाराम माणिक दहिफळे यांनी आपले दोन बैल आखाड्यावर बांधले असता गुरुवारी दुपारी आरोपी बाळू नामदेव मुंढे रा.दगडवाडी व व्यंकट शिवराम मुंढे रा. किनगाव यांनी संगनमत करून एक बैल चोरी केला. या बैलाची किंमत अंदाजे 30000रू. फिर्यादीत नोंदआहे. शेतकरी तुकाराम दहिफळे यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसात दोघा विरोध शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
