
भादा (दिपक पाटील) : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन भादा पोलीसांनी हद्दीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात 1)बोरगाव येथे आरोपी दत्ता अंकुश अंबाड वय 22 वर्ष व नारायण अंकुश अंबाड हे शेतात गावठी हातभट्टी दारू विकताना मिळून आले, त्या ठिकाणाहून 20 लिटर गावठी दारू किंमत रु.1000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 2) टाका या गावी आरोपी गोविंद श्रीमंत साठे वय 52 वर्ष याचे घरी स्वयंपाकाचे गॅस शेगडी खाली खड्ड्यात लपवून ठेवलेल्या देशी दारूच्या 32 बाटल्या किंमत रु. 960/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावरुन भादा पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद सर्वांविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये भादा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.
सदरील कामगीरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, पोलीस उपाधीक्षक डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक विलास नवले, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, गिरी, डोलारे , फड, महेश चव्हाण, विठ्ठल दिंडे,सतीश सारोळे यांनी केली आहे. #DSPNEWS
