येरमाळा :- { प्रतिनिधी } येरमाळा पोलीस ठाण्यातील पथक दि. १८ ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.०० वाजण्याच्या सुमारास येरमाळा ते येडशी या महामार्गावर रात्रगस्तीस होते, यावेळी मलकापुर फाटा परिसरातील अंधारात असणाऱ्या तानाजी काळे, दिलीप पवार, रमेश पवार, जालिंदर काळे, सर्व रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा यांना पोलीसांनी हटकले. त्या वेळी त्यांच्याजवळ प्रत्येकी १ कि.ग्रॅ. च्या ६६ पिशव्या खाद्य तेल, तुर डाळीचे ३० कि.ग्रॅ. वजनाची २ पोती आढळून आली. भल्या पहाटे अंधारात हा माल कुठून आणला या बद्दल ते तिघे समाधानकारक माहिती दिली नसल्याने तो माल महामार्गावरील वाहनांच्या हौदातून चोरलेला असावा असा पोलीसांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोउपनि- नजिनोद्दीन नाईकवाडी यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- १२४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून , पुढील तपास येरमाळा पोलीस करीत आहेत. #DSPNEWS
