
उमरगा ( प्रतिनिधी) : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरगा यांचे पथक दि. 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 06.00 वाजणाच्या सुमारास, जकेकुर ते उमरगा चौरस्ता या गस्तीवर होते. यावेळी बोलेरो वाहन क्र. एम.एच. 25 एजे 1750 हा मागील बाजूचा हौद टारपोलीनने बंद असलेल्या अवस्थेत जकेकुर दिशेने जात असलेला आढळला.उपविभागीय पथकास संशय आल्याने सदर वाहनस थांबवून तपासणी केली असता कनगरा, ता. उस्मानाबाद येथील प्रशांत पांडुरंग टेळे व लोहारा येथील आप्पा विजय मोरे हे दोघे बोलेरो वाहनातून एकुण 24 पोत्यांत गुटखा व तत्सम पदार्थ असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला अन्नपदार्थ अवैधरीत्या वाहून नेत असतांना पथकास आढळले. यावरुन पोउपनि- सदानंद भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. #DSPNEWS
