Spread the love

शिरूर अनंतपाळ निटूर:-{ दिपक पाटील }अवैध दारू विक्री आणि हातभट्टी विरोधात पोलीस अधीक्षक पथक विभाग हे धाडसञ राबविण्यात यशस्वी होत आहे ,चार दिवसापूर्वीच सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात लातूर येथे १ कोटी २५ लाख रूपयांचा अवैध गुटखा जप्त केला ,तरिही अवैध धंदेवाले सुधारायचे नाव घेत नाहीत, अशीच एक कार्यवाहीत निटूर पोलीस चौकीतील पोलीसांनी धडक कारवाई सुरू करत कलांडी व निटूर येथील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करत देशी दारू संञा ४४ शिष्या किंमत २६४० चा मुद्देमाल जप्त केला आहे. १ } शंकर साधू साळुंखे व मिनाबाई अशोक कटाळे दोघंही रा.निटूर व अंकुश शंकर वाघमारे रा.कलांडी या तिघांविरुद्ध शिरूर अनंतपाळ ठाण्यात दारू बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे , ही कारवाई सहाय्यक पोलीस निकेतन कदम व पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांच्या मार्गदर्शनात निटूर पोलिस चौकीचे पो.हे. सत्यवान कांबळे व पो.काॅ. हरि कांबळवाड यांनी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!