
लातूर :- { दिपक पाटील } लातूर शहरातील दाट भरवस्तीत असलेल्या साई मंदीराची दान पेटी चोरणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी तत्परतेने अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे, शहरातील उच्चभ्रू दाट वस्तीत असलेल्या साई मंदीरातील दोन दानपेट्या वरती काही अज्ञात चोरट्यांनी काही दिवसापूर्वी डल्ला मारला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमी दारा मार्फत गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने संशयित आरोपी गणेश श्रीकांत साळुंखे, वय २२ वर्ष, रा. कैलास नगर लातूर यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने स्वतः विशाल नगर साई मंदिर लातूर येथील मेनगेट चे कडी कोंडा सळईने तोडून आत प्रवेश करून आतील दानपेटीचे कुलूप सळईने तोडून त्यामधील पैसे चोरी केले आहेत त्यामधील १० हजार रुपये स्वतःकडे खिशात ठेऊन उर्वरित रक्कम एका बॅगमध्ये ठेऊन ती बॅग त्याचा मित्र विनायक भाऊसाहेब पवार रा. भांबरी चौक, नांदगाव रोड, रेल्वे पटरीच्या शेजारी लातूर याच्याकडे दिली असल्याचे कबूल केले आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात सफौ संजय भोसले, पोह कोळसुरे, पोना जाधव, पोना बंटी गायकवाड, पोना नाना भोंग, चापोका कांबळे यांच्या पथकाने बजावली आहे.
