Spread the love

वाढवणा :- { प्रतिनिधी } पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने पोलीस ठाणे स्तरावर अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.सदर मोहीमे अंतर्गत पोलीस ठाण्यातील पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
वाढवणा तालुका उदगीर येथे दिनांक 31/12/2021 रोजी दुपारी 2 ते 5 वाजण्याच्या सुमारास घरफोडीची घटना घडली होती. त्यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 4 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता वरिष्ठांचे व उपविभागीय पोलिस अधिकारी, चाकूर (चार्ज अहमदपूर) सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे मार्गदर्शन वाढवणा पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, दिनांक 31/12/ 2021 घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी लाळी बुद्रुक या गावात आहे. त्यावरून सदर पथकाने लाळी गावात जाऊन संशयित आरोपी नामे जगदीश जनकराव लाळे यास लाळी गावातून ताब्यात घेण्यात आले.
संशयित आरोपी लाळे यास पथकाने विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली त्याने वाढवणा येथे चोरी केल्याचे कबूल करून त्याने चोरलेले सोन्याची दागिने एकूण 07 तोळे 08 ग्रॅम काढून दिल्याने तो मुद्देमाल व त्याने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 4 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर क्रमांक 262/2021 कलम 454, 380 भादवि मधील त्याने चोरलेली सोन्याची अंगठी व लॉकेट पण नमूद आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे.
नमूद आरोपी नामे जगदीश जनकराव लाळे, वय 28 वर्ष, राहणार लाळी बुद्रुक, तालुका उदगीर
यास दिनांक.06/01/2022 रोजी पोलीस ठाणे वाढवणा येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 227/2021 कलम 454, 380 भा द वि मध्ये अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन वाढवण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण हे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण, पोलीस अमलदार – मोहन केंद्रे, संजय कलकत्ते, इक्राम उजडे, प्रदीप घोरपडे, गौस शेख ,बोईनवाड यांनी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!