लातुर :- { प्रतिनिधी } शहरात साथीदारांच्या मदतीने जबरी चोऱ्या, गंभीर मारामाऱ्या आणि दुखापतीचे गुन्हे करणारा फरार गुन्हेगार नितीन शिवदास भालके, राहणार लातूर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे
नितीन भालके याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून मागील काही दिवसापासून तो गुन्हे करून फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे आणि पोलीस ठाण्याची पथके त्याच्या मागावर होती. गोपनीय माहितीच्या आधारावर तो लातूरमध्ये आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली.
पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे ,अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे, पोलीस अमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापटे ,राजाभाऊ मस्के, नितीन कठारे ,जमीर शेख, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने नितिन भालके यास नंदी स्टॉप परिसरात पकडून पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांच्या स्वाधीन केले आहे
.
सदरचा आरोपी हा
1)पोलीस ठाणे विवेकानंद चौक गुन्हा रजिस्टर क्रमांक 466/ 2020 कलम 392 34, भादवि
2)गुन्हा रजिस्टर क्रमांक 131/ 2021 कलम 307 भादवि.
3) पोलीस ठाणे एमआयडीसी
गुन्हा नंबर 455 /2020 कलम 392,34 भादवि
या गुन्ह्यात फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला विवेकानंद पोलीस स्टेशन मध्ये हजर केल्यावरून विवेकानंद चौक पोलिसांनी त्यास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
