
औराद शहाजनी :- { दिपक पाटील } तगरखेडा येथील तरुणी ने औराद शहाजनी येथील पोलीस ठाण्यात जाऊन विनयभंगाची तक्रार दाखल करण्यास गेली असता सांगीतले की,
मी दररोज नोकरीस जाताना न येताना माझ्या गावातील एक तरूण इंद्रजीत चंद्रकांत थेटे नावाचा मुलगा हा मला अश्लील इशारे करीत असतो व जवळ कोण माणसं नसले तर मला तु लई आवडते, व अश्लिल भाषेत बोलतो पण मी गरीब परिस्थीती व शेतकरी कुटूंबातील असल्यामुळे सहन करत होते पण दि. 02/01/2022 रोजी वेळ आमवस्या असल्याने शेताकडे गेलो होतो व संध्याकाळी परत येत असताना अंदाजे 05.00 वाजता इंद्रजीत हा जवळ आला व माझा हात धरून अश्लील चाळे करत माझी ओढणी ओढली असताना माझ्या आईने ते पाहून जवळ येवून त्याला जाब विचारला असताना त्याने तिथेच बाजुला पडलेली लाकडी काठी घेऊन आईच्या डोक्यात मारून जखमी केले व पुन्हा माझ्या आईचे केस धरून मलाही वाईट हेतूने झोंबाझोंबी करत मारहाण करीत होता, ही घटना घडलेली दिवशी औराद शहा. पोलिस ठाण्यात संध्याकाळी 07.00 वाजता हजर होऊन सांगितली पोलीसांकडे संबंधीत व्यक्तीवर कार्यवाही करण्यासाठी अर्ज दिला असता तेथील ठाणे अंमलदार हे सुरूवातीला पोहोच देत नव्हते ? तेथील स. पो. निरीक्षकांना फोनकरून सदरची घटना सांगत होते तरीही त्यांनी अर्ज घेतला नाही म्हणून मी पोलीस अधिक्षक साहेब, लातूर यांना फोन केले त्यांनी तो उचलला नाही. नंतर मी पोलीस कंट्रोल रूमला फोन केले तेव्हा औराद पोलीसांनी माझ्या अर्ज घेतला व पोहोच दिली. गु.र.नं.02/2022 मध्ये कलम 354,324,323,504,506 भा.द.वी प्रमाणे गुन्हा नोंद करून घेतला ,
सदरची घटना दि. 02/01/2022 रोजी होऊनही औराद पोलिसांनी अद्याप एफ. आय. आर ची प्रत पिडीत तरूणी ला दिलेली नाही व ही घटना घडल्यापासुन आरोपी आजही गावात व घरासमोर चकरा का मारत आहे. तो आरोपी मी पोलीसांना खरेदी घेतलोय माझे काहीच होत नाही. अशी चर्चा गावात करीत आहे. तसेच माझी ही घटना पाहणारे जे लोक साक्षीदार आहेत , पोलीसांच्या समोर नावे जाताच ती नावे गावातील थेटे मंडळीतील लोक हे त्या साक्षीदारांना तु साक्षीदार “तु म्हणून कशी काय सही केलास म्हणून अशी धमकी देत आहेत, या आरोपीस अटक करण्यात का येत नाही, संबंधीत ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येऊन ही, त्यावर कारवाई करण्यात का आली नाही, हे प्रश्नचिन्ह गावातील नागरिक उपस्थित करीत आहेत.
