Spread the love

लातूर,दि.31 (प्रतिनिधी)- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना दिलेल्या आदेशानुसार व विभागीय उप-आयुक्त पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह़यातील अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, लातूर तसेच स्टापनी हासेगाववाडी चौक, ता. औसा, जि. लातूर या ठिकाणी दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी रात्री टाकलेल्या छाप्यामध्ये देशी मद्याचे 8 बॉक्स (180 च्या 384 बाटल्या) तसेच गुन्ह़यामध्ये वापरलेली एक दुकाची मोटरसायकल जप्त केली या गुन्ह़यात दोन आरोपींना अटक केली.
तसेच उदगीर विभागामध्ये कासारशिरसी, ता. निलंगा, कोकर्ला, ता. जळकोट व वंजारवाडा, ता. देवणी अशा ठिकाणी एकूण चार गुन्हे नोंदवून हातभट़टी 50 लिटर, देशी दारुच्या 180 मिलीच्या 43 बाटल्या तसेच विदेशी मद्याच्या 180 मिलीच्या 68 बाटल्या व दोन दुचाकी वाहन असा मुद्येमाल जप्त केला, या चार गुन्ह़यांमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली एकूण 5 गुन्ह़यांमध्ये चार आरोपींना अटक करुन एकूण 1 लाख 44 हजार 100 रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमध्ये निरीक्षक राहुल बांगर, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक शिवदास कुबडे, व्ही. पी. राठोड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, अनंत कारभारी, निलेश गुणाले, जवान अनिरुद्व देशपांडे, हनुमंत मुंडे, कपिल गोसावी, सुरेश काळे, ज्योतीराम पवार, श्रीकांत एस. साळुंके व वाहनचालक विक्रम परळीकर यांनी सहभाग नोंदविला.
अवैध मद्यविक्री विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार तसेच राज्य उत्पादन शुल्क, लातूर विभाग व पोलीस विभाग, लातूर यांच्यामार्फत रात्रीच्या गस्तीमध्ये ढाब्यावर बसून मद्यसेवनासाठी विनामद्यप्राशन परवाना जर कोणी मद्यप्राशन करतांना आढळल्यास त्यावर कारवाई होणार असल्याचे तसेच अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 8422001133 क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे, आवाहन लातूर राज्य उत्पादन अधीक्षक शुल्क चे, गणेश बारगजे यांनी केले आहे.

                                             

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!