
चाकूर :- { प्रतिनिधी } पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणे प्रमुखांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात चाकुर विभागीय पोलीस अधिकारी श्री. निकेतन कदम यांना बातमी दाराकडून गोपनीय माहिती माहिती मिळाली की, चापोली ते नायगाव जाणारे रोड वरील बुंदराळे यांचे फॉर्म मध्ये चंदनाचे झाडांची तोड करून त्याचा गाभा ठेवलेला आहे.
सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी सदरच्या माहितीची शहानिशा करून दिनांक 28/12/ 2021 रोजी चे मध्यरात्री पोलिस स्टेशन चाकूरचे पोलिस अधिकारी/ अमलदार व पथकासह नमूद ठिकाणी छापा टाकला. तेव्हा फार्महाउस मधील एका खोलीमध्ये चंदन वृक्षाची तोड करून लाकडाची साल काढून तासलेले लाकडे पोत्यामध्ये भरून लपवून ठेवल्याचे आढळून आले. सदरच्या चंदनाच्या झाडांची वजन केले असता त्याचे वजन 500 किलो भरले. त्याची अंदाजे किंमत 19 लाख इतकी असून पोलिसाने पंचनामा करून सदरचा मुद्देमाल ताब्यात घेतला.चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार शिराज शेख यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 568/2021 कलम 379, 353,332, 504, 506, 34 भादवी, कलम 41 42 भारतीय वन अधिनियम 1927 व कलम 04 महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम प्रमाणे आरोपी नामे
1) रामदास शेषराव बुंदराडे
2) महादू शेषराव बुंदराडे
3) पांडुरंग शेषराव बुंदराडे
4) तुकाराम शेषराव बुंदराळे सर्व राहणार आनंदवाडी तालुका चाकूर. यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय सदरची कारवाई करीत असताना आरोपीने कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी नमूद गुन्ह्यातील कलम वाढ करण्यात आलेली आहे, तसेच आणखीन एका फार्महाऊसवर कारवाई करत 100 किलो वजनाचे चंदनाची गाभा व त्या मालाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे पांढरी रंग याची महिंद्रा स्कार्पिओ जीप असा एकूण 08 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस अंमलदार पिराजी पुट्टेवाड यांचे फिर्यादीवरून आरोपी नामे
1)नरसिंग रामा बुंदराळे वय 50 वर्ष
2) नितीन नरसिंग बुंदराळे वय 28 वर्ष दोघे राहणार आनंदवाडी तालुका चाकूर.
यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 567/2021 कलम 379, 34 कलम 41, 42 भारतीय वन अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद दोन्ही गुन्ह्यात आरोपी नामे
1) नरसिंग रामा बुंदराळे
2) नितीन नरसिंग बुंदराळे यांना अटक करण्यात आलेली असुर फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अभंग माने, कपिल पाटील, पोलीस अमलदार शिराज शेख, पिराजी पुट्टेवाड, सूर्यकांत कलमे, हनुमंत मस्के यांनी केली आहे.
