Spread the love

उदगीर :- (प्रतिनिधी) उदगीर शहरातील सामान्य रुग्णालयातील कंपाउंडरने प्रसुती साठी दाखल झालेल्या महिला रुग्णांची तपासणी करण्याच्या बहाण्याने वाईट हेतूने स्पर्श करून विनयभंग केल्याची घटना 12/12/2021 रोजी घडली होती. त्यावरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिनांक13/12/2021 गुन्हा रजिस्टर क्रमांक. 338/2021कलम. 354,506 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास उदगीर शहर पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक कविता जाधव हे करीत होते.
सदरच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री .अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॅनियल बेन व श्री.दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विविध पथके तयार करण्यात आली होती. त्या पथकामार्फत गुन्ह्यातील फरार आरोपीचा वेगवेगळ्या ठिकाणी पथकामार्फत शोध सुरू होता.
पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून नमूद पथकाने फरार आरोपी नामे सचिन राजमाने यास 13/12/2021 रोजी गुन्ह्यात अटक करण्यात केली असून आज रोजी मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने नमूद आरोपीस 14 दिवसाची न्यायालीन कोठडी सुनावली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन उदगीर शहर चे महिला पोलीस उपनिरीक्षक कविता जाधव हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!