Spread the love


तुळजापूर : { प्रतिनिधी } उस्मानाबाद ते लातूर रस्त्यावरील पाचुंदा तलावाजवळ दोन पुरुष गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून असल्याची गोपनीय खबर तुळजापूर पोलीस ठाण्यातील पथकास दि. 30.12.2021 रोजी 16.45 वा. सुमारास मिळाली होती. यावर पथकाने लागलीच पाचुंदा तलाव परिसर गाठून खंडाळा, ता. तुळजापूर येथील राजेंद्र सुरेश कांबळे यांसह एका अल्पवयीन मुलास (विधी संघर्षग्रस्त बालक) पिस्टलसह ताब्यात घेतले होते.
उपरोक्त प्रकरणी दाखल असलेल्या तुळजापूर पोलीस ठाण्यात गु.नों.क्र. 465 / 2021 शस्त्र कायदा कलम- 36, 25 सह 188, 34 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 37, 135 च्या उर्वरीत तपासादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती सई भोरे-पाटील व तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री. सुशील चव्हाण, श्री. ज्ञानेश्वर कांबळे, पोउपनि- श्री राहुल रोटे, श्री. चनशेट्टी, पोहेकॉ- अजय सोनवणे, अतुल यादव, पोना- गणेश माळी, लक्ष्मी चव्हाण, अमोल भोपळे, गणेश पतंगे, अजित सोनवणे, बाळासाहेब देवबोणे यांच्या पथकाने आरोपी 1) सचिन खंडु जाधव, वय 29 वर्षे 2) शैलेश श्रीकांत नरवडे, वय 23 वर्षे 3) विश्वजीत विजय आमृतराव, वय 25 वर्षे 4) सौरभ दत्तात्रय टोले, वय 22 वर्षे यांसह उस्मानाबाद येथील 5) मयुर बापु बनसोडे, वय 26 वर्षे सर्व रा. तुळजापूर यांना दि. 13 जानेवारी रोजी ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे‍ 4 पिस्टल सह 3 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तुळजापूर पोलीसांनी केलेल्या या यशस्वी कामगीरीचे पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन व अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!