Spread the love

अनोळखी मयताची तात्काळ ओळख पटवुन, अज्ञात कारणासाठी

चाकूर ( प्रतिनिधी) याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 25/04/2022 रोजी मौजे मोहनाळ येथील शेत गट नंबर 6 मधील बालाजी रामराव मुंडे यांचे शेतामध्ये एका अनोळखी पुरूष जातीचे इसमाचे डोक्यात काठीने मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारल्याची माहिती मिळाली त्यावरून श्री. अभयसिंह देशमुख, सहायक पोलीस अधिक्षक, प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे, चाकुर यांनी घटनास्थळी जावुन मयताची पाहणी करुन मयताची ओळख पटवीने कामी दोन पथके तयार मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असताना पथकास माहिती मिळाली की, सदरचा मयत इसम हा अंकुश देवराव डावरे, वय 40 वर्षे, रा साठे नगर अहमदपुर जि लातुर असा असल्याचे निष्पन्न झाल्याने भा द. वि. कलम 302 अन्वये अज्ञात मारेकऱ्याविरुध्द गुन्हा नोंद केला होता.

           नमुद गुन्ह्याचा तपास श्री. अभयसिंह देशमुख, सहायक पोलीस अधिक्षक, प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे, चाकुर हे करत असुन सदर मयत इसमास कोणी मारहाण करुन खुन केला याबाबत सर्व शक्यता तपासुन पाहत असताना मयताचे सर्व बाबींनी तपास केला परंतु गुन्हा उघडकीस येईल असी कोणतिही उपयुक्त माहिती मिळत नसल्याने निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक साहेब, अनुराग जैन,अपर पोलीस अधिक्षक,  निकेतन कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी , उप विभाग चाकुर यांचे मार्गदर्शनाखाली मयत वापरत असलेले वस्तू व इतर तांत्रीक गोष्टींचा तपास करुन आरोपीचा शोध घेणे बाबत सुचनांप्रमाणे तपासी अधिकारी श्री. अभयसिंह देशमुख, सहायक पोलीस अधिक्षक यांनी त्यांचे स्टाफचे मदतीने तांत्रीक तपास करुन गुन्ह्यातील आरेापी निष्पन्न करुन आरोपी नामे 

1) सुनिल विठ्ठल भोसले, वय 25 वर्षे, रा. हरंगुळ खुर्द ता जि लातुर सध्या करमाळा तालुका आणि पुणे
याने सदरचा खुन केला असल्याचे निष्पन्न करुन त्यास पुणे येथुन सदर पथकाने शिताफीने गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेवुन त्यास पोलीस स्टेशन येथे आणुन गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यात तांत्रीक तपासकामी सायबर सेल लातुर येथील सपोनि गायकवाड व स्टाफने वेळोवेळी तांत्रीक मदत करुन गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.सदरचा खुन आरोपीने मयताचे अंगावरील त्याचे मुलीचे लग्नासाठी घातलेले नवीन व चांगले कपडे पाहुन त्याचे जवळ चांगला मोबाईल व पैसे असतील म्हणुन त्यास चाकुर जुने बसस्थानकाजवळुन घरणी येथे सोडतो असे म्हणुन लिफ्ट देवुन त्यास मोहनाळ शिवारात टमाट्याचे काढलेले पिकात नेवुन त्याचा काठीने मारहाण मारुन खुन केला.
सदर खुनाचे गुन्ह्याचा उलगडा मा. निसार तांबोळी, पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र नांदेड,मा. निखील पिंगळे,पोलीस अधीक्षक साहेब, मा. अनुराग जैन,अपर पोलीस अधिक्षक साहेब, मा. निकेतन कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, उप विभाग चाकुर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अभयसिंह देशमुख, सहायक पोलीस अधिक्षक, प्रभारी अधिकारी, पोलीस ठाणे, चाकुर पोउपनि तुकाराम फड, पोउपनि कपिल पाटील, पोलीस अमलदार हनुमंत आरदवाड, सुनिल घोडके, सुग्रीव मुंडे, सुकेश केंद्रे, हनुमंत म्हस्के,पाराजी पुठ्ठेवाड, महेश चव्हाण यांचे पथकाने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!