

औराद शहाजानी (प्रतिनिधी) येथील महेश अर्बन को.कॉपरोटीव्ह बँकेने कर्ज वाटप न करताच चढविला १६ लाख रुपयांचा बोजा आणी नंतर कर्ज वाटपासाठी सुरु केली टाळाटाळ त्यामुळे ग्राहकाने केली संबंधित बँकेच्या संचालकासह , शाखा व्यवस्थापक आणी बोजा नोंद घेणाऱ्या ग्रामसेवक यांचेवर कार्यवाही करण्याची केली मागणी. याची सविस्तर माहीती अशी की , तक्रारदार अर्जुन पाटील यांचे आईच्या नावे औराद शहाजानी येथे मंथन अॅन्ड हॉटेलसाठी १६,००,०००/- (सोळा लाख रुपये) चे कर्ज घेतले होते. त्यासाठी हॉटेलची जागा मिळकत व राहते घराची मिळकत ही गाहाण खत (तारण) ठेवण्यासाठी मंजुरी दिली होती. सदर नोंद गहाणखत मालमत्तेवर घेणे गरजचे होते. परंतु संबंधीत महेश अर्बन कॉपरोटीव्ह बँकेतील संबंधीत बँक व्यवस्थापक व संचालकाने त्याची नोंद माझ्या घरावर व मंथन बार अॅन्ड हॉटेलवर घेण्याऐवजी माझ्या नामे अर्जुन शिवाजीराव भंडारे (पाटील) यांचे नावे असलेल्या जमीन सर्वे नंबर ७१/ड वर नोंद केली ते माझ्या लक्षात आले नाही नंतर मी सन २०२१ मध्ये आणखीन वाढीव कर्जाची मागणी केली असता, महेश अर्बन कॉपरोटीव्ह बँकेतील सध्याचे असलेले व्यवस्थापक यांनी मला २,००,०००/- (दोन लाख) रुपयांची मागणी केली,व मला कर्ज देण्यास नकार दिला. माझे कॅश क्रिडेट खाते देखील बंद करुन टाकण्यात आले आहे. संचालक मंडळ व शाखा व्यवस्थापक यांनी
याविषयी तक्रारदार यांनी जिल्हा उपनिबंधक लातुर यांचेकडे दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२ रोजी तक्रार दाखल केली व त्यावर चौकशी अधिकारी म्हणुन उपनिबंधक यांनी अहमदपूर सहाय्यक निबंधक यांना नेमुन चौकशी अहवाल देण्यासाठी दिनांक २४ मार्च २०२२ रोजी पत्र दिले पण जवळपास चार महिने झाले बँकेचे संचालक आमदार बाबासाहेब पाटील यांच्या दबावामुळे अहमदपुरचे सहाय्यक निबंधक चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत त्यामुळे तक्रारदार यांनी संचालक मंडळावर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडे तक्रार दिली आहे.
बँक संचालक व व्यवस्थापक यांचे सावकारी धोरण व मनमाणी कारभार करणाऱ्या बँकेच्या संचालकांवर पोलीस प्रशासन व रिजर्व बैंक कार्यवाही करेल का ? अशी अपेक्षा तक्रारदार करीत आहेत.
