एक आरोपी अटक:
लातूर (प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषता मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीसआणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते.त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 17/ 07/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, चाकूर तालुक्यात राहणाऱ्या एका संशयित इसमाने पोलीस ठाणे गांधी चौक येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील मोटर सायकल त्याच्या घरी लपवून ठेवली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथकाने चाकूर येथे पोहोचून संशयित इसमाच्या राचन्नावाडी येथील घरावर छापा मारून संशयित इसम नामे तुकाराम ईश्वर आवाळे, वय 21 वर्ष,राहणार रायचन्नावाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर. यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्यांच्याकडील मोटारसायकली ह्या लातूर जिल्ह्यातील लातूर,निलंगा, अहमदपूर तसेच पुणे जिल्ह्यातील कात्रज व भोसरी या ठिकाणाहून चोरी करून विकण्यासाठी त्याच्या घरातील मोकळ्या जागेत लपवून ठेवल्याचे सांगितले. सदर मोटारसायकल चे चेसिस,इंजिन नंबरची पडताळणी केली असता खालील प्रमाणे दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील मोटारसायकल असल्याचे निष्पन्न झाले.
1) पोलीस ठाणे गांधी चौक गुन्हा रजिस्टर क्रमांक 292/2022 कलम 379 भादवी.
2)पोलीस ठाणे निलंगा गुन्हा रजिस्टर क्रमांक 170/2022 कलम 379 भादवी.
3) पोलीस ठाणे अहमदपूर, गुन्हा रजिस्टर क्रमांक 339/2022 कलम 379 भादवी.तसेच पुणे जिल्ह्यातील कात्रज व भोसरी येथून चोरी केलेली प्रत्येकी एक मोटारसायकल असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून एकूण पाच मोटारसायकल आरोपीच्या ताब्यातून जप्त करून पुढील तपास कामी पोलीस स्टेशन गांधी चौक यांची ताब्यात देण्यात आले आहे
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात सपोनी सचिन द्रोणाचार्य,सफौ संजय भोसले,पोलीस अंमलदार राम गवारे, सिद्धेश्वर जाधव,सुधीर कोळसुरे,बंटी गायकवाड, नाना भोंग, चालक प्रदीप चोपणे,चंद्रकांत केंद्रे यांनी पार पाडली.
