Spread the love

खोटे कागदपत्रे तयार करून खुला प्लॉट स्वत:च्या नावावर

लातूर ( प्रतिनिधी) याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 16 /07/2022 रोजी कळंब तालुक्यात राहणाऱ्या एका फिर्यादीने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.त्यानुसार 

1)पंकज संभाजी काटे, (युवा भीमसेना अध्यक्ष) राहणार अवंती नगर, लातूर.

2) मलिकार्जुन चनाप्पा शेटे, राहणार आमलेश्वर नगर, लातूर

3) अनिस नूरखा पठाण, राहणार पेठ तालुका लातूर

4) जब्बार सत्तार सय्यद, राहणार बोडका तालुका लातूर.

 या चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद आरोपींनी आपसात संगनमत करून लबाडीच्या इराद्याने,कपटाने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
       फिर्यादीच्या आईने 1989 साली मयत चन्नाप्पा तुकाप्पा शेटे यांच्याकडून खाडगाव परिसरातील खुला प्लॉट विकत घेतला होता. सन 2010 रोजी वरील नमूद आरोपींनी संगणमत करून फिर्यादीची मयत आईच्या नावे असलेल्या प्लॉटच्या N.A.प्रतिवर खाडाखोड करून बनावट सत्यप्रती तयार करून ते मूळ दस्तऐवजाला जोडून गुन्ह्यातील आरोपी मलिकार्जुन चन्नाप्पा शेटे  यांच्याकडून पंकज संभाजी काटे यांनी खरेदी केला.
        खोटे कागदपत्र व मूळ कागदपत्रात खाडाखोड करून परस्पर जमिनीची विक्री खरेदी व्यवहार करून फिर्यादीची फसवणूक केले वरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे नमूद आरोपींचा विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक 389/2022 कलम 420,465, 467, 468, 471,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. लातूर शहरातील व परिसरातील जमिनीचे दर वाढल्याने काही इसम संगणमत करून खुल्या प्लटांचे/ जागेचे खोटे बनावट कागदपत्र तयार करून जमिनी लाटण्याचा प्रयत्न करण्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.असे चुकीचे गैरव्यवहार  करणाऱ्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!