Spread the love

तीन लाख पन्नास हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
अहमदपूर: ( प्रतिनिधी) पोलीस स्टेशन अहमदपुर येथे नेमणुकीस असलेले सपोनि दुरपडे, सोबत पोकॉ 1828 नारायण बेंबडे असे दिनांक 22.07.2022 रोजी पहाटे 02.30 वाजण्याचे सुमारास रात्रगस्त पेट्रोलीगं करीत असताना एक इसम सराईत रित्या मोटार सायकल ढकलत लातुर रोड वरील स्वराज हॉटेलचे बाजुचे मुंढे यांचे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी घेवुन जात असताना दिसला सदर इसमास त्यांचे ताब्यातील मोटार सायकलची विचारपुस केली असता सदर इसमाने असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यास त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनिल बापुराव धोत्रे वय 24 वर्ष रा.. दवणहिपरगा ता. देवणी असे सांगितले. सदर इसमास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांचे ताब्यातील मोटार सायकल ही कृपा सदन इंग्लीश स्कुल लातुर येथुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले वरुन सदर इसमास पोलीस स्टेशन अहमदपुर गुरन 180/2022 कलम 379 भादवी या गुन्हयात अटक करून पीसीआर घेवुन तपास करता सदर आरोपीकडुन वर नमुद मोटार सायकल व ईतर 06 असे एकुण 07 चोरी केलेले मोटार सायकली मिळुन आल्या. त्यापैकी 01 पल्सर, 01 शाईन, 01 पॅशन प्रो कर्नाटक, उदगीर हृदयीतुन 02 शाईन गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतुन व 01 शाईन विवेकानंद पोलीस स्टेशन हद्यीतुन चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदरचा आरोपी हा पीसीआर मध्ये असुन आणखी तपास सुरू आहे. सदरची कार्यवाही ही श्री निखिल पिंगळे मा. पोलीस अधिक्षक लातुर, श्री अनुराग जैन मा. अप्पर पोलीस अधिक्षक लातुर, बलराज लंजिले मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपुर यांचे मार्गदर्शनाखाली श्री चितांबर कामठेवाड पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अहमदपुर यांचे सुचने वरून श्री विठठल दुरपडे, श्री रामचंद्र केदार सपोनि सोबत पोहे सुहास बेबडे, पोना कैलास चौधरी, पोकॉ परमेश्वर वागदकर, पोकॉ नारायण बेबंडे, खयुम शेख, चालक शेडगे यांनी कामगिरी बजावली असुन पुढील तपास पोहे 1096 सुहास बेबडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!