Spread the love

इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने

200 पेक्षा अधिक रुग्णालय सहभागी होणार
लातूर शहर आणि परीसरातील जास्तीत जास्त नागरीकांनी शिबिराचा लाभ घ्यावा

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

लातूर (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमीत्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमात २०० पेक्षा अधिक रुग्णालय सहभागी होत आहेत. या शिबीराचा लातूर शहर आणि परीसरातील जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समाजकारणासाठी राजकारण हे सुत्र घेऊन कायम लोकसेवेचा विचार करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रियमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांनी सर्वसामान्य जनतेला सहजगत्या सर्व प्रकारच्या सोयीसुवीधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. लातूर जिल्हा हा तर त्यांच्यासाठी कायम जिव्हाळयाचा विषय राहीला. सर्वसामान्य माणूस केंद्रबिदू मानून त्यांनी येथे शैक्षणिक तसेच आरोग्याच्या सुवीधा उभारल्या. त्यांच्या त्या दूरदृष्टीमूळेच आज लातूर हे देशातील शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आले असून आरोग्य सेवेचे केंद्र म्हणूनही हे शहर आता विकसीत होत आहे. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या लोकसेवेला सर्मपीत वाटचालीची आठवण म्हणून आणि ते कार्य पूढे रहावे याकरीता त्यांच्या स्मृतिदिनी इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर सन २०१४ पासून सातत्यांने आयोजित करण्यात येत आहे.
आपल्या आदरणीय लोकनेत्याचे लोकसेवेचे कार्य पूढे चालवून ठेवण्यासाठी एकाच दिवशी शेकडो रूग्णालयात स्वयस्फूर्ती्ने आरोग्य शिबीर आयोजिक करण्याचे देशातील हे ऐकमेव उदाहरण असून हाही एक लातूर पॅटर्नच आहे असे मला वाटते. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या महाआरोग्य शिबीरात आजवर लाखो रूग्णांची मोफत तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. सर्व सामान्य परिस्थितीतील रूग्णांना या शिबीराचा मोठया प्रमाणात फायदा होतांना दिसत आहे.
यावर्षीही इंडीयन मेडीकल असोशिएशन लातूर, अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, सचिव डॉ. मुकूंद भिसे, निमाचे डॉ. दयानंद मोटेगावकर, इंडीयन डेंटल डॉ.धनराज शितोळे, होमीओेपॅथी असोशिएशन डॉ. पुरूषोत्तम दरक या संघटनाचे सर्व पदाधिकारी त्याच बरोबर डॉ. अशोक पोददार, डॉ. अजय जाधव, डॉ. किणीकर, डॉ. संजय पौळ यांच्यासह शहरातील वरीष्ठ डॉक्टर मंडळी हे सदरील महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेत आहेत. विलासराव देशमुख फांऊडेशनच्या वतीने त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येत आहे. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून या महाआरोग्य शिबीरात न्युरोसर्जरी ३, पिडीयॅट्रीक सर्जरी २, कार्डीयालॉजी २, नेफ्रालॉजी १, मुत्रविकार २, सर्जरी ५, फिजीशीयन १२, वंध्यत्व ४, पॅथालॉजी ३, सोनोग्राफी सीटी स्कॅन, एमआरआय ३, जनरल फिजीशीयन ७४, होमिओपॅथी ६, डेंटल ४८, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून, स्त्री रुग्णालय लातूर , ग्रामिण रूग्णालय बाभळगाव, ग्रामिण रूग्णालय मुरूड, ग्रामिण रूग्णालय रेणापूर, येथे स्त्रियांचे कर्करोग निदान व उपचार असे जवळपास २०० पेक्षा अधिक रूग्णांलयात लातूर शहर व परीसरात मोफत तपसणी होणार आहे. या निमीत्ताने हजारोंच्या संख्येने तज्ञ डॉक्टर रूग्णसेसाठी उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी प्रयोग शाळेतील तसेच अदययावत तंत्रज्ञानाच्या काही तपासणी मोफत तर काही तपासणी व उपचार सवलतीच्या दरात होणार आहेत. दुर्धर आजार असलेल्या सामान्य परिस्थितीत असलेल्या रूगणांना फायदा होणार आहे. या महाआरोग्य शिबीराचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

[श्रेष्ठदान अवयवदान]
सद्य परिस्थितीत अवयवदानाला आलेले महत्व आणि गरज लक्षात घेऊन आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यार्थ यावर्षी पासून इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विदयमाने अवयवदान संकल्प मोहीमेचा शुभारंभ होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुवीधा लातूरमध्ये उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातील असेही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!