लातूर ( प्रतिनिधी) – शारदा विद्यालयात क्रांतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी होते.
यावेळी रोहित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांंतिगीताने करण्यात आली. प्रास्ताविक सह शिक्षिका सुषमा मुंडे यांनी केले. सूत्रसंचालन दर्शना देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन अर्चना देशमुख यांनी केले.
यावेळी एकनाथ जाधव, सूरज गड्डिमे, अनघा पाटील, मानसी पाटील, माधुरी पाटील, उषा गुडदे, माया ससाणे, शीतल नडगिरे, अश्विनी पवार, वर्षा कांबळे, रेणुका समुद्रे, गीतांजली गिरी, प्रांजली पाटील उपस्थित होते.
