लातूर ( दिपक पाटील ) : राज्य उत्पादन शुल्क चे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार लातूरचे प्रभारी अधीक्षक अभिनित देशमुख यांच्या नेतृत्वात एरंडी ते सारोळा , ता. औसा, जि. लातूर या रोडवर दि. १० आगस्ट २०२२ रोजी अवैध विनापरवाना गोवा राज्य निर्मित विदेशी दारूची वाहतूक करत असतांना चारचाकी वाहनाचा पाठलाग करुन पकडण्यात आले. सदर गुन्हयामध्ये ७५०मीली चे ८ गोवाराज्य निर्मित विदेशी मद्याचे बॉक्स व एक शेवरोले कंपनीची चारचाकी कार क्र. एम.एच १२-एन एक्स -८११३ व तसेच ४०० बुच असा एकूण ३, ४२, ४००/- {तीन लाख बेचाळीस हजार चारशे पन्नास रुपये} एवढा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हयामध्ये शरद रामराव पवार, वय ३३ वर्षे, रा. उदगीर, जि. लातूर याला अटक करण्यात आली.
सदर कारवाई ही राज्य उत्पादन शुल्क चे प्रभारी अधीक्षक अभिजित देशमुख, निरीक्षक राहूल बांगर, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक – एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, अमोल जाधव, स्वप्नील काळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, जवान अनिरुद्ध देशपांडे, हनुमंत मुंडे, संतोष केंद्रे, सुरेश काळे यांनी सहभाग नोंदविला. पुढील तपास लातूर दुय्यम निरीक्षक ए. के. शिंदे हे करित आहेत.
