
पोलीस ठाणे गांधी चौक पोलिसाच्या विशेष पथकाची रात्रगस्त दरम्यान कारवाई,13 मोटारसायकलीसह 6,30,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. दोन आरोपींना अटक
लातूर ( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे विशेषतः मोटरसायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावरील पोलीस पथका कडून जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी संबंधाने घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.सदर मोहीम अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक श्री. प्रेमप्रकाश माकोडे यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे गांधी चौक व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय लातूर शहर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठाकडून वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात येत होते.
सदर पथक पोलीस ठाणे हद्दीतील घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना दिनांक 08/08/2022 रोजी मध्यरात्री रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान विशेष पथकास दोन इसम एका मोटरसायकल वर शाहू चौक परिसरात संशयितरित्या फिरताना आढळून आले. नमूद पथकातील पोलिसांनी मोटरसायकलस्वारांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विशेष पथकातील पोलिसांनी पाठलाग करून पळून जाणाऱ्या संशयित इसमास रिंग रोड जवळील गुळ मार्केट परिसरात ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव
1)शुभम उर्फ सुग्रीव जरीचंद कुंभकर्ण, वय 28 वर्ष, राहणार घारगाव, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. सध्या राहणार एलआयसी कॉलनी, लातूर.
2) गोपाळ सखाराम माने, वय 29 वर्ष,राहणार रुई धारूर तालुका धारूर जिल्हा बीड.
असे असल्याचे सांगून त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल काही दिवसांपूर्वीच चोरी केल्याचे सांगितले.
त्यावरून नमूद आरोपींना पोलीस स्टेशन गांधी चौक येथे आणून त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलचे चेसिस व इंजिन नंबरची पडताळणी केली असता सदरची मोटरसायकल पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 348/2022 कलम 379 भादवी प्रमाणे दाखल गुन्ह्यातली असल्याचे निदर्शनास आले. नमूद आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडे अधिक तपास केले असता त्यांनी लातूर शहरातील पोलीस ठाणे शिवाजीनगर, एमआयडीसी, गांधी चौक तसेच पोलीस ठाणे आनंदनगर जिल्हा उस्मानाबाद. पोलीस ठाणे फौजदार चावडी, सोलापूर येथील विविध ठिकाणाहून चोरी केल्याचे कबूल करून ते सध्या वापरत असलेली मोटरसायकल व त्यांनी इतर ठिकाणी लपवून ठेवलेल्या 12 मोटरसायकली अशा एकूण 13 मोटरसायकली नमूद आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेले आहेत.. मोटारसायकल चोरीतील आरोपी त्यांनी चोरलेल्या मोटारसायकली अतिशय कमी किमतीत लोकांना भूल थापा देऊन विक्री करणार होते असे कबूल केले.
नमूद आरोपीकडून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार मंथलवाड हे करीत आहेत.पोलीस ठाणे गांधी चौक व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय लातूर शहर च्या विशेष पथकाने उत्कृष्टरित्या तपास करून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करून 13 मोटार सायकलसह 6 लाख 40 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई वरिष्ठांचे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. प्रेमकुमार माकोडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे,पोलीस अमलदार दामोदर मुळे, उमाकांत पवार, युसुफ शेख,मुकेश सूर्यवंशी,रणवीर देशमुख, शिवाजी पाटील, रणजीत शिंदे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांचे विशेष पथकातील सहाय्यक फौजदार रामचंद्र ढगे, पोलीस अमलदार महेश पारडे ,अभिमन्यू सोनटक्के यांनी पार पाडली .
