
किनगाव ( प्रतिनिधी) फिर्यादी मलिकर्जून पलमटे पो.ना. यांच्या फिर्यादी वरून आरोपी अहमद शेख रा. पंचशील नगर किनगाव ताः अहमदपुर यांनी दिः7.9.2022 रोजी 17.45 वाजता किनगाव येथील पंचशील नगर मध्ये घरच्या बाजूस खुल्या जागेत मटका खेळवत असताना अढळून आला त्यात नगदी रक्कम 2710रू व मटका जुगाराचे साहित्य मिळून आले. आरोपीने स्वतःचे फायदयसाठी लोकाकडून पैसे घेऊन मटक्याच्या आकड्यावर लाऊन कल्याण नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना रोख रक्कम व जुगाराचे साहित्या सह मिळुन आला म्हणुन गु .र.नं.210/2022 कलम 12अ मजुका नुसार नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सो.पो.नि शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ASI आर. पी.गोखरे हे करीत आहे.
