Spread the love

किनगाव ( प्रतिनिधी) अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. किनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने किनगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले आहे. सदर पथक अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 05/09/2022 रोजी पोलीस ठाणे किनगाव चे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश बंकवाड यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस ठाणे हद्दीतील मौजे धानोरा (बु) येथील समाज मंदीरातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते मागील मोकळ्या जागेत येथे चालू असलेल्या तिर्रट जुगारावर छापा मारला. त्या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन पत्त्यावर जुगार खेळत व खेळवीत असताना 20 इसम आढळून आले. सदर ठिकाणी नमूद इसमानी स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लाऊन तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम व वापरलेली वाहने असा एकूण 5 लाख 44 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात 1) शरद अच्युतराव शिंदे, वय – 30 वर्ष, 2) विठ्ठल तातेराव सांळुके, वय – 29 वर्ष, 3) महादेव मंचक जोंधळे, वय – 25 वर्ष, 4) बद्रीनाथ अशोक गायकवाड, वय – 28 वर्ष 5) मालाजी बैजनाथ खलसे, वय – 32 वर्ष, 6) नामदेव महादु कोलपुसे, वय – 40 वर्ष, 7) संतोष माधवराव कोलपुसे, वय – 32 वर्ष, 8) बुध्दीवंत सुग्रीव तलवारे, वय – 27 वर्ष, 9) नितीन मनोहर शिंदे, वय – 30 वर्ष, 10) उध्दव विश्वनाथ कोलपुसे, वय – 29 वर्ष, 11) धोंडीराम इरप्पा रोडगे, वय – 30 वर्ष, 12) बळीराम आप्पाराव चव्हाण, वय – 32 वर्ष, 13) अरविंद भिमराव जोंधळे, वय – 33 वर्ष, 14) नितीन शेषेराव गायकवाड, वय – 28 वर्ष 15) कृष्णा ब्रम्हानंद सांळुके, वय – 32 वर्ष, 16) अंकुश महादेव पंदे, वय – 28 वर्ष, 17) कृष्णा गुंडाजी होनाळे, वय – 20 वर्ष, 18) जगदेव बाबुराव होनाळे, वय – 42 वर्ष, 19) शेख रशीद जब्बार, वय – 28 वर्ष, 20) जगन्नाथ काशीनाथ कोलपुसे, वय – 32 वर्ष सर्व रा. धानोरा ता.अहमदपुर या 20 जणांविरुध्द या प्रकरणी गुरनं 209/22 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास किनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मुरकुटे हे करीत आहेत. सदरची कामगिरी अहमदपूर उपविभागाचा तात्पुरता चार्ज असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सूधीर खिरडकर यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे किनगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, पोलीस अमलदार व्यंकटराव महाके, मल्लिकार्जुन पलमटे, नागनाथ कातळे, सुनील श्रीरामे, होमगार्ड सोमनाथ शिंगडे,आनंद डोंगरे, संदीप मुसळे, नाथराव मुंढे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!