जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण चार लाख सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत.
चाकूर ( प्रतिनिधी) या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, यांचे मार्गदर्शनात चाकूर उपविभागात येणाऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर श्री. निकेतन कदम यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
सदर पथक अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 04/09/2022 रोजी सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस ठाणे चाकूर हद्दीतील आष्टामोड येथील एका गणेश मंडळाचे कार्यकर्ते खेळत असलेल्या तिर्रट जुगारावर छापा मारला. त्या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन पत्त्यावर जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आलेले 1) राजेंद्र शिवाजी लोखंडे वय 39 वर्षे रा. गांजूरवाडी ता. चाकूर 2)ज्ञानेश्वर भरत पलाने वय 35 वर्षे रा. शिवनी मजरा ता. चाकूर3) गणेश चतुभुज शिंदे वय- 33 वर्षे रा. गांजूर ता. चाकूर 4) भगवानमाधवराव गुरमे वय 32 वर्षे रा. गांजूरवाडी ता. चाकूर 5) प्रशांत व्यंकटरावशिंदे वय 30 वर्षे रा. गांजूर ता. चाकूर 6) रमेश नरसींग सोळंके वय-| 40 वर्षे रा. नांदगाव ता. चाकूर 7) राम दिनेश ईंगळे वय 21 वर्षे रा.बामणी ता. जि. लातूर 8) संतोश एकनाथ दंडे वय 35 वर्षे रा. बामणी ता.जि. लातूर 9) बालाजी दिगंबर पलाने वय- 64 वर्षे रा. शिवनी मदरा ता.चाकूर 10) शाम बालाजी माडे वय 38 वर्षे रा. बामनी ता.जि. लातूर(11) भागवत हरिशचंद्र शिंदे वय 65 वर्षे रा. गांजूर ता. चाकूर व इतर अनोळखी 4 ईसम नाव माहित नाही
यांच्यावर पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 323/2022 कलम 12(अ) मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 27 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास चाकूर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री. निकेतन कदम,यांचे नेतृत्वात त्यांच्या पथकातील पोलीस ठाणे चाकूर येथील सहाय्यक फौजदार सुभाष हरणे, पोलीस अमलदार मारुती तुडमे, उदयसिंग चव्हाण, विपिन मामडगे , रियाज शेख, रितेश आनंदुरकर यांनी केली.