Spread the love


लातूर ( प्रतिनिधी)  या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी  चे गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावरील पोलीस पथका कडून जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी संबंधाने घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात आली होती.सदर मोहीम अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक श्री. संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अमलदार यांचे विशेष पथक तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठाकडून वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात येत  होते. सदर पथक पोलीस ठाणे हद्दीतील घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना दिनांक 31/08/2022 रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे एमआयडीसी येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 499/2022 कलम 379 भादवी मधील चांडेश्वर व गंगापूर येथे राहणारे दोन इसम मोटारसायकल चोरीतील संशयित असण्याची शक्यता आहे.अशी माहिती मिळाल्याने माहितीची शहनिशा व विश्लेषण करून सदर पथक त्या-त्या भागात माहिती मधील आरोपीच्या शोध घेतले असता  मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित नामे-

1) समीर अहमद अली सय्यद, वय 20 वर्ष, राहणार चांडेश्वर, तालुका जिल्हा लातूर.

2) अनिकेत बाबुराव सातपुते, वय 19 वर्ष, राहणार गंगापूर तालुका जिल्हा लातूर.

   यांना त्यांचे राहते ठिकाणाहून दिनांक 31/08/2022 रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलीस ठाणे एमआयडीसीच्या हद्दीतील विविध ठिकाणाहून मोटारसायकल चोरी करून कमी किमतीत मोटरसायकल विकल्याचे सांगितले. त्यावरून अधिक तपास करून नमूद पथकाने त्याच्याकडून 3 मोटरसायकली जप्त केली आहेत. तसेच नमूद आरोपीना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.नमूद आरोपीकडून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस अंमलदार वांगे,कज्जेवाड,घुले हे करीत आहेत,एमआयडीसीच्या पथकाने उत्कृष्टरित्या तपास करून मोटरसायकल चोरीच्या तीन गुन्ह्याची उकल करून 3 मोटार सायकलसह 2 लाख 55 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक श्री.संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड, पोलीस अमलदार बेल्लाळे ,संजू फुलारी ,अर्जुन राजपूत ,मदार बोपले, जाधव,पांढरे यांनी पार पाडली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!