Spread the love


लातूर ( प्रतिनिधी)या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करणे बाबत निर्देशित केले होते.
            त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पथक तयार करुन अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकाला दिनांक 29/08/2022 रोजी गोपनीय माहिती मिळाली की,रहीम नगर  परिसरात एक युवक हातात तलवार घेऊन फिरत आहे. त्यावरून सदर पथकाने

अरमान नजीर शेख, वय 18 वर्ष, राहणार रहीम नगर, लातूर.
यास रहीम नगर परिसरातून ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडे एक लोखंडी तलवार मिळून आली.
त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 522/2022 कलम 4, 25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यास आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश गळगट्टे, पोलीस अमलदार खंडू कलकत्ते, मुन्ना नलवाड, नारायण शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!