Spread the love

लातूर : { दिपक पाटील } पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या अवैध पानमसाला मोहीम दि १४/०८/२०२१ ते १६/०८/२०२१ या दिवशी जिल्हाभर राबविण्यात आली होती,जवळपास शहरातील बरेचजण दुकानदार शटर लावून फरार झाले. जिल्ह्यात २३ केसेस व १० लाख ४० हजार ७२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.लातूर शहरातील शिवाजीनगर हद्दीत गुटखा पानमसाला विक्री होत असलेल्या गुटखा साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी छापा टाकला तसेच पोलीस अधीक्षक विशेष पथक यांनीही औसा व एमआयडीसी लातूर येथे कारवाई करत मुद्देमाल जप्त केला , स्थानिक गुन्हे शाखा केसेस ४,पोलीस अधीक्षक विशेष पथक २, व पोलीस स्टेशन अंतर्गत औसा १ ,देवणी ९, चाकूर १, गातेगाव १, मुरुड १,उदगीर शहर १,अहमदपुर १, औराद शहाजनी १, कासार शिरशी १ अशा २३ केसेस दाखल करण्यात आल्या असुन आता पर्यंत १० लाख ४० हजार सातशे पच्चवीस रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला . व अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांच्या तक्रारीवरून वरील पोलीस ठाण्यात कलम ३२८, १८८,२७२,२७३,अन्न सुरक्षा अधिनियम ५९ अन्वये तक्रार दाखल करण्यात आल्या पुढील तपास त्या त्या पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत. सदरील कार्यवाहीत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व स्था.गू.शा. पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनात पो.ना.सदानंद योगी , पो.हे. गाडेकर, पो.काॅ.साखरे, म.पो.ना.गिरी, म.पो.हे.साखरे, चा.पो.ना. लांडगे, पो.ना. प्रकाश भोसले , पो.ना.हासबे, पो.हे. टेकाळे, पो.हे.काॅ.भोसले ,पो.ना.खुर्रम काझी,पो.ना. रवी गोंदकर ,पो.ना.यशपाल कांबळे व पोलीस अधीक्षक विशेष पथकातील चंद्रकांत डांगे, रमेश चोधरी, मोहन सुरवसे,देशमुख, खंदाडे, यांनी कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!