
लातूर ( प्रतिनिधी ) मराठवाडा मुक्ती संग्रामाचे औचित्यसाधून उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख, उपरुग्णालयाचे डॉ.दिपक हुग्गे, डॉ. श्रीधर पाठक यांच्या सह रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
नेत्ररोग तज्ञ डॉ. श्रीधर पाठक यांनी एकूण 20 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. साळुंखे , डॉ. पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी माजी मंत्री संभाजीराव पाटील यांनी डोळ्याचे ऑपरेशन झालेल्या रुग्णांची अस्थेवाईकपणे चौकशी केली.
