Spread the love

उमरगा – ( दिपक पाटील ) राज्यात बंदी असलेला पण परराज्यात उत्पादीत होणारा गुटखा, सुंगधी तंबाखू आदी पदार्थ पोलिस पकडतात. तरीही शहरासह जिल्ह्यातील पान टपऱ्यांवर हाच गुटखा अगदी सहजतेने उपलब्ध होतो.पोलिसांच्या हाती लागणारा गुटखा सापडतो. तो विकणाऱ्यांवर कारवाईपण होते, मात्र त्याची विक्री तरीही थांबत नाही, असेच चित्र गेल्या अनेक वर्षांपासून दिसत आहे.तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास हानीकारक असतात. यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे जीवही जातो. या पार्श्वभूमीवर राज्यात गुटखा, सुगंधी तंबाखूच्या विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. दुर्देवाने इतर राज्यात गुटखा उत्पादनास बंदी नसल्याने तेथून तस्करी करून हा माल राज्यात येतो.गुटख्याची तस्करी परराज्यातून होत असते. विशेषत: कर्नाटक, मध्य प्रदेश वा राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या वाहनांमध्ये गुटखा येतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये हा साठा बंदी नसलेल्या राज्यात चालला जात होता, असे स्पष्टीकरण देण्यात येते. मात्र, तपासाअंती गुटख्याचे स्थानिक कनेक्शनही समोर येते. परराज्यातून येणारे तस्कर हायवेने आणि कमीत कमी तपासणी होईल, अशी रस्त्याने येतात. मात्र, माहिती मिळाली की तपासणी नाके उभी करून कारवाई केली जाते, परराज्यातील तस्करी सुरू असते. स्थानिक बाजारपेठेत त्याची मागणी असल्याने हा प्रकार घडतो. यामुळे कारवाई करून गुटखा वा सुगंधी तंबाखू पकडणे, एवढे काम सातत्याने करावे लागते. अशीच वाहतुक करताना उमरगा पोलीस ठाण्याचे एक पथक दि. 03.10.2022 रोजी 23.00 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्तीस असताना गस्ती दरम्यान पथकाने एकोंडी शिवारातील रस्त्यावर इनोव्हा कार क्र. एम.एच. 12 सीवाय 9560 ही संशयास्पद कार थांबवून कार चालक- अदिनाथ दिगंबर मुळे, वय 25 वर्षे, रा. विलासपुर (पांढरी), ता. लोहारा यांची विचारपुस केली असता त्याने सुरुवातीस पथकास उडवा-उडवीची उत्तरे देत होता. यावर पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांनी कारची झडती घेतली असता एकंदरीत त्या कारमधून एकुण 1,578 पुडक्यांत गुटखा व तंबाखू जन्य पदार्थ असा 2,09,088 रूपये किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ नेत असल्याचे आढळले. यावर पथकाने नमूद गुटखा व वाहतुकीस वापरलेली इनोव्हा कार असा एकुण 6,09,088 रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन अन्न व औषध प्रशासन विभागास कळवून अन्न सुरक्षा अधिकारी- नसरीन तनवीर मुजावर यांनी नमूद गुटखा हा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत असल्याची खात्री करुन त्यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून अदिनाथ मुळे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 273, 188, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26 (2) (i) (iv), 27 (3) (e) सह वाचन अधिनियमांतर्गत 512/2022 हा गुन्हा उमरगा पोलीस ठाण्यात काल दि. 04.10.2022 रोजी दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन उमरगा उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली उरमगा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज राठोड, सपोनि- श्री. महेश क्षिरसागर, पोहेकॉ- खतीब, पोना- लक्ष्मण शिंदे, पोकॉ- बाबासाहेब कांबळे यांच्या पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि- श्री. शिंदे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!