उमरगा ( दिपक पाटील) उमरगा पोलीस ठाण्यात हद्दीतील नागराळ (गुंजोटी) येथे अवैध दारू साठा करून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करून ठेवलेल्या दारू
अड्ड्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे, पो.हे.काॅ वाघमारे व पो.काॅ.घूले यांनी आज सायंकाळी धडक
कार्यवाही करीत टॅगो पंच देशी १८० मीली च्या ६५ बाटल्या व विदेशी ib च्या १८० मी.ली. ८ बाटल्या दारू साठ्यासह ५ हजार ७५० रुपये किमतीचा साठा जप्त करीत एकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात पोलीस काॅन्स्टेबल संभाजी घुले यांनी फिर्याद दाखल केली आहे. नागराळ ( गुंजोटी) गावात एका घरात एक इसम देशी विदेशी व विदेशी दारूची चोरटी विक्री करीत असल्याची गोपनीय माहीती मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे सहकाऱ्यांसह छापा टाकून अवैध दारू विक्रेता दारू विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आला. याप्रकरणी मंगेश माणिक साळुंखे रा. नागराळ ( गुंजोटी) यास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस हेड काॅन्स्टेबल नागनाथ वाघमारे करत आहेत,सदर कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
