Spread the love

लातूर :- { दिपक पाटील }आई व वडील घरी नसल्याचे पाहून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी युवराज प्रभू पवार वय ३१ वर्ष राहणार नांदेड नाका लातूर यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे सायंकाळ चे वेळेस अल्पवयीन मुलगी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील आपल्या घरी भावाबरोबर खेळत असताना आरोपीने तिला आत खोलीत घेऊन जात वाईट हेतूने मुलीचा विनयभंग केला. मुलगी ओरडली व त्याने तिला सोडून दिले , घरी आई व वडील आल्यावर आईच्या गळ्याला पडत रडत रडत सर्व काही सांगीतले व त्याचा जाब विचारत असताना आरोपीने त्यांनाच अरेरावी केली, मग त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली .आरोपीवर गु.र.नं. ४७१/२०२१ कलम ३५४,३५४ ब ५०४,५०६ भादवि विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये कलम ७ ,८ व अनू.जा.ज. प्रतिबंधक कलम ३ {१} {R} {S}{W} गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे करत आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!