Spread the love

लातूर :- { दिपक पाटील } सुखी संसाराचे स्वप्न प्रत्येक मुलगी पहात असते, आपल्याला एखादा राजबिंडा राजकुमार मिळावा ही तिने पाहिलेले स्वप्न असते,आपल्या लेकीचे संसार निट व्हावा हे तिच्या पित्याला वाटत असते, तो आपल्या लेकीसाठी आपले सरस्व पणाला लावून लेकीच लग्नसमारंभ धुमधडाक्यात पार पाडत असतो,त्यात जावई जर सरकारी नौकरीत असेल तर पहायचे कामच नाही, मोठ्या थाटात तो सर्वाना सांगतो की माझा जावई सरकारी नोकरीत आहे तो, लेक माझी सासरी सुखी राहील असे त्याला वाटत असते, पण खेळ कोणाला दैवाचा कळला आहे, जे स्वप्न लेक व बाप पहात होते ते धुळीस मिळाले आहे, अशीच एक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे, पहीले रजिस्टर लग्न झालेले असताना देखील पोलीस असलेल्या नवरोबाने दुसरी सोबत रितीरिवाजानुसार ३०~०१~२१ रोजी दुसरे लग्न केले व मानपान घेत सासुरवाडी कडून स्ञी धन म्हणून सोनेनाने व पैसा अडका देखील घेतला व नवीन संसार थाटला . पोलीस नवरा मिळाला म्हणून ती खूप खुश देखील होती, पण नियतीला ते मान्यच नव्हते काही दिवस सुखाचे गेल्यावर मात्र त्याला पहिल्या बायकोचा फोन आला व सारे पितळ उघडे पडले , त्यांच्यात वादावादी झाली व ही गोष्ट पै पाहून्याला समजली , त्यानंतर काही दिवस उलटल्यानंतर त्याने तिच्यावर तिच्या संमती विरूद्ध दमदाटी करून शारिरीक संबंध प्रस्थापित केले. एकतर ह्याने पहीले लग्न झालेले असताना ,माझ्यापासून लपवून ठेवले,माझी फसवणूक केली, वरून दमदाटी करून शारिरीक संबंध ठेवत असल्या कारणावरून तिने चक्क पोलीस ठाणे गाठून , पोलीस पती प्रवीण श्रीहरी जाधव पोलीस शिपाई नेमणुक लातूर ग्रामीण वय ३२ वर्ष रा. चिखली ता.जी. उस्मानाबाद ह.मु. पोलीस क्वार्टर,लातूर व त्याचे आई ,वडील व भाऊ व अन्य एका विरूद्ध विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध कलम ३७६ {२}{एन},४२०,४९३,४९५,४९६,५०६,३४ भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे, व त्यातील पोलीस पतीला अटक करण्यात आली आहे, तसेच पुढील तपास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास तिडके करत आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!